मराठवाडा

मराठवाडा बांधकाम मजुर कामगार संघटनेच्या कार्यालयाचे अ‍ॅडीशनल कमिश्नर शिवानंद टाकसाळेंच्या हस्ते उद्घाटन

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

बीड , दि. १२ :- बीड येथे मराठवाडा बांधकाम मजुर व इतर कामगार संघटनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन खंदक रोड कारंजा येथे संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून अ‍ॅडीशनल कमिश्नर शिवानंद टाकसाळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


प्रमुख उपस्थिती म्हणून अ‍ॅड.शफीक भाऊ, शेख अजहर, अझहरोद्दीन (गोलु), अदनान खान उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना टाकसाळे साहेब म्हणाले की, सर्व कामगार हे मेहनती असतात, यांच्या मुलांसाठी शासनाकडून अनेक योजना आहेत.

कामगारांसाठी अनेक योजना आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी व कामगारांचा योजनेचा फायदा घेऊकन देण्याचा काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल, आणि माझ्याकडून जेवढे सहकार्य होईल तेवढे मी करीन, संघटनेसाठी मी सदैव तत्पर राहील व मी या संघटनेचा सदस्य म्हणून काम करुन संघटनेला मी भरपूर ताकत देईल असे टाकसाळे म्हणाले. यावेळी शफीक खान, मोमीन रफीक, शेख जमील, शेख जमील, सय्यद मिनहाजोद्दीन, शेख रफीक, आमेर पठाण, शेख खासीम, शेख नदीमोद्दीन, सय्यद अमानत, शेख इम्रान, सलाम बागवान आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शफीक खान यांनी मानले. सूत्रसंचालन साखेब सर तर प्रस्तावित शेख जमील यांनी केले.

80 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close