ताज्या घडामोडी

राजुर येथे वाघाने केले गायीला ठार

रूस्तम शेख – कळंब

कळंब , दि. १२ :- तालुक्यातील राजुर येथे जंगलात चराई करीता गेलेली गाय व गोऱ्हा यांच्या वर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुराख्याने जनावरांना चारण्या करीता राजुर येथील ज़ंगलात नेले असता कात्री येथील रहिवासी सुखदेव नागोसे यांचा गोऱ्हा व प्रभाकर झलके रा कात्री यांची गाय या दोन्ही पाळीव .प्राण्या वर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. या परीसरात वाघ असल्याने सर्वत्र भितीयुक्त वातावरण निर्माण झाले असुन वाघाचा तसेच वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांनी माागणी केली आहे.
पुढील तपास वनविभाग करीत असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी रुस्तम शेख यांनी दिली आहे.

70 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close