नागपुर

गणपती विसर्जन साठी गेलेले दोघे नदीत वाहून गेले…

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नागपूर //हिंगणा , दि. १३ :- हिंगणा तालुका अंतर्गत संगम आणि खैरे पन्नासे गावाचा मधुन वाहणाऱ्या वेना नदी मध्ये गणपती‌ विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका परिवारातील दोन व्यक्ती नदी मध्ये बुडाले.ही घटना घडली.रात्री पासुन प्रशासनाकडुन त्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे.अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.बुडालेल्या व्यक्तींची नावे सुरेश शिवराम फिरके (४८) व अजिंक्य रमेश फिरके (१८) डिगडोह (देवी) एमआयडीसी हिंगणा रोड येथे राहणारे आहेत.

माहीतीनुसार डीगडोह (देवी )फिरके कुटुंब आणि इतर कुटुंबियांनी बसवलेले गणपती विसर्जन करण्यासाठी आणले होते.सांयकाळी ६:३० ला गणपती विसर्जन झाल्यानंतर नदी मध्ये आंघोळ करतांनी सुरेश फिरके खोल पाण्यात गेले असल्यामुळे डुबायला लागले.त्यांना वाचवायला अंजीक्य फिरके पुढे आला.परंतु पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे दोघेही पाण्याचा प्रवाहाचा वेगात वाहुन गेले.हिंगण्याचे पोलीस निरीक्षक सपना क्षिरसागर आपल्या पोलीस पथका सोबत घटनास्थळी पोहचले.बचाव कार्याकरिता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.रात्रभर शोधमोहीम सुरू होती.याघटनेमुळे डिगडोह सोबत जवळपासच्या गावात शोककळा पसरली आहे.

32 Views
कृपया शेअर करा
Show More

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close