Home बुलडाणा अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आवश्यक ती काळजी घ्यावी:-...

अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आवश्यक ती काळजी घ्यावी:- डॉ सारिका भगत

165

प्रतिनिधी(रवि आण्णा जाधव)
देऊळगाव राजा :- कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतामध्ये कोरोनाचा संचार झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे कोरोना बाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आवश्यक ती काळजी घ्यावी व अफवा पसरविण्याचे टाळावे असे आव्हान तहसीलदार डॉ.सारिका भगत यांनी पत्रकार परिषदेत केले.
दि.१३ मार्च रोजी तहसील कार्यलयात कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा थरकाप उडतो आहे. सद्या शहरात होळी पासून कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याचे चर्चना उत आला आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुढील माहिती देताना डॉ.सारिका भगत म्हणाल्या की, कोरोना या नावाने सद्या सोशल मीडिया वर धुमाकूळ सुरू आहे. वर्तमानपत्रे तसेच अनेक चॅनेल्सवर बातम्या सुरू असल्याने नागरिकांचे मनात भीती वाढत आहे, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्णांची संख्या अकरा झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहे, त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तरी कोणीही शोशल मीडिया वर अफवा पसरू नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, गट शिक्षण अधिकारी मुसदवले, वैदकीय अधीक्षक डॉ.असमा मुजावर, डॉ.सुभाष शिंगणे, डॉ.मांटे, पोलीस प्रशासनाच्या वतीने उमाळे, वन विभाग प्रतिनिधी, पत्रकार, महसूल कर्मचारी, आदी उपस्थित होते.

आपली काळजी घेणे गरजेचे : डॉ.असमा मुजावर
“आरोग्य यंत्रणा सतर्क असून अफवांवर विश्वास ठेवू नये काही अडचण असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा” देऊळगावराजा तालुका परिसरात आतापर्यंत कोणाची लग्न झालेले रुग्ण आढळून आले नाही. जनावरा पासून दूर राहा, आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा असे आव्हान वैद्यकीय अधीक्षक डॉ.असमा मुजावर यांनी केले.