Home विदर्भ चंद्रपुरात कोरोना व्हायरसचा धसका…!

चंद्रपुरात कोरोना व्हायरसचा धसका…!

128

ऐतिहासिक महाकाली चैत्र पौर्णिमेची यात्रा जिल्हा प्रशासन व संस्थानने केली रद्द…!!

विनोद पञे

चंद्रपूर , दि. १४ :- येथील प्रसिध्द महाकाली यात्रेवर कोरोना विषाणुचे सावट असुन ८ एप्रिल पासुन सुरु होणारी ही यात्रा रद्द करण्यासाठी जिल्हा प्रशासन व महाकाली मंदीर व्यवस्थापनाची महत्वपुर्ण बैठक होवुन या वर्षी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय यांनी घेतला आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी मराठवाड्यातील नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातुर, परभणी व पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापुर, सांगली, सोलापुर, सातारा व विदर्भातील ११ जिल्ह्यासह तेलंगना व आंध्र प्रदेशातुन मोठ्या संख्येने भावीक येत असतात. ही यात्रा सलग १ महिना चालत असुन भावीकांची प्रचंड गर्दी असते. ही यात्रेत होणारी प्रचंड गर्दी पहाता जिल्हा प्रशासन व महाकाली मंदीर व्यवस्थापनाने या वर्षीची यात्रा ही रद्द केली आहे. एप्रिल महिन्यात होवु घातलेल्या या महाकाली यात्रेवर कोरोनाचे सावट दिसत आहे. विशेष बाब ही की, शेकडो वर्षाच्या इतिहासात महाकाली यात्रा आजवर कधीही रद्द झालेली नाही. यात्रा अवकाळी पावसामुळे तथा एक वर्षी उद्भवलेल्या पेच प्रसंगामुळे रद्द होण्याची स्थिती निर्माण झाली होती परंतु तशा ही स्थिती ही यात्रा संपन्न झाली होती. परंतु या कोरोनोच्या सावटामुळे या वर्षीची यात्रा रद्द करुन भाविकांनी सहकार्य करुन याची दखल घ्यावी असे महाकाली व्यवस्थापनेकडुन कळविण्यात आले.
या विषाणूचा चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महाकाली मंदिर ट्रस्ट यांच्या बैठकीत ३० मार्च नंतर होणारी चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची चैत्र पौर्णिमेची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे ३ राज्यातून येणारे भाविक यंदा माता महाकालीच्या दर्शनाला मुकणार आहे, कधी न रद्द होणारी ही यात्रा कोरोना विषाणूमुळे रद्द झाली आहे, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी यात्रेत येणार्‍या भाविकांना आवाहन करीत यात्रेत सहभागी न होण्याची विनंती केली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गरज नसेल तर प्रवास टाळावा, सध्या जिल्हा प्रशासनाने पण शासकीय कार्यक्रम सुद्धा रद्द केले आहे.