ताज्या घडामोडी

चिखली शहरात देहविक्री व्यवसायासह अवैध धंदे जोमात

देहविक्री व्यवसायात जबरदस्ती अल्पवयीन मुली ओढल्या जात असल्याची तक्रार दाखल…!!

अमीन शाह

बुलडाणा / चिखली , दि . 18 :- सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी चिखली पोलिस स्टेशनला अवैध धंद्याविरोधात तक्रार दाखल केली आहें,
चिखली शहरात दिवसेंदिवस राजरोसपणे अवैध धंदे व खुले आम देह व्यापार जोरात सुरू असल्याच्या चर्चा असुन दि.17 सप्टें रोजी अनिल वाकोडे नामक वजन काटा व्यापारी व शेतकरी युवा नेते आपल्या व्यवसायिक कामा निमित्त चिखली शहरातील पेट्रोल पँम्प नजीक असलेल्या पत्रा बाजार येथे आपल्या ग्राहकांच्या दुकानवर गेले असता त्या ठिकाणी एक 50 वर्षांची महिला एका16, 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी त्या मुलीला का मारता हे विचारण्यासाठी त्यांच्या कडे धाव घेतली असता समोरून चार फँटर त्यांच्या अंगावर धावून आले व त्यांना दमदाटी करून त्या ठिकाणावरून परत केले, सदर मुलीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ओढले जात असल्याचे तिच्या नाकाराणे तिला मारहाण करत असल्याचे अमानवीय क्रुत्य डोळ्यासमोर घडत असताना अनिल यांनी तात्काळ चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना फोन केला असता त्यांनी फोन स्वीकारलाच नसल्याने त्यांनी हताश होऊन त्या ठिकाणावरून परतले व सदर बाब त्यांनी रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांना सांगितली असता तात्काळ त्यांनी पत्रकार बांधव व आपल्या पदाधिकारी यांना सोबत घेऊन चिखली पोलिस स्टेशन गाठले व पोलिस अधिकाऱ्यांना सदर बाब सांगून त्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखला झाले व त्या ठिकाणी चौकशी करून सदर पीडित मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी मूळ पीडित अल्पवयीन मुलीला कुठेतरी लपवून बनावट महिलेला समोर करून सदर मारहाण याच महिलेला केल्याचे पोलिसां समोर सांगून सदर प्रकऱणाची सारव सारव केली, परंतु या ठिकाणी मारहान करून जबरदस्तीने अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करायला भाग पाडत असल्याची लेखी तक्रार चिखली पोलिस स्टेशनला देऊन सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशांत ढोरे पाटील, अनिल वाकोडे, नितीन राजपूत , विनायक सरनाईक, पत्रकार छोटू कांबळे , रवी तळेकर, गणेश जाधव,शुभम हिवरकर,बिटू देशमुख , शरद राऊत, सचीन काकडे,भारत खंडागले , गोपाल ढोरे पाटील,दत्ता आष्टीकर,शिवा भगत,रवी पवार, अविनाश भाकडे, यशपाल लहाने, गणेश आकाल,मनोज काटीकर, राधाकीसन भूतेकर, प्रकाश पंडागळे,धनवे आदींनी केली आहें.

677 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close