विदर्भ

मनसावळी -वर्धा बस भिवापूर नाल्यावर अडकली…

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

नाल्याजवळ बस अडकल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान कोणाची परीक्षा तर कोणी मुलाखतीतुन बाद.

वर्धा , दि. १९ :- जिल्ह्यातील वायगाव निपाणी नजीक असणाऱ्या भिवापूर गावात असलेल्या नाल्याला मंगळवारी रात्री झालेल्या मुसळ धार पावसाने पूर आल्याने, हिंगणघाट मार्गे मनसावळी ला जाणारी बस नाल्यावरच अडकली, त्यात, प्रवाशांबरोबर शालेय विध्यार्थी, शहराला मुलाखती विद्यार्थी होते, बस अडकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर मुलाखतीसाठी जाणारे विदयार्थी बाद झाले.

वर्धा ते हिंगणघाट या मार्गाचे काम सुरूअसल्याने वर्धा-मनसावली बस क्रमांक MH 40 N 8993 ही भिवापूर मार्गे टाकण्यात आली.पण मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे
तळेगाव व भिवापूर च्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला..खरं तर नाल्यावरील पुलांची उंची हि रस्त्या पेक्षा हि कमी असल्यामुळे थोडाही पाऊस पडला तर पुलांवर पाणी येतात.असच काहीसं दृश्य संपूर्ण ग्रामीण भागाला-शहराला जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक रस्ताच्या पुलाचे असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की कानाडोळा करणे सुरू आहे, हे मात्र कळेनासे झालेले आहे.एकीकडे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी वेगवेगळ्या व अनोख्या योजना देशात आखल्या जात आहे मात्र डिजिटल व्हिलेज कडे कोणाचेच लक्ष नाही का असा आक्षेपार्ह सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे.निम्मे दिवसावरती विधानसभा निवडणुक येऊन पोहचली असून यात प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या आशीर्वाद यात्रा मत मागण्यासाठी काढल्या जात आहे मात्र ग्रामीण भागातील समस्येचा कळकळा याना कळणार का नाही यावर जनतेला विचार पडलेला आहे.
आजच्या सारख्या रोज भेडसावणाऱ्या परिस्तिथी मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, काही विद्यार्थ्यांचे आज परीक्षा होती तर काही मुलांचे प्रॅक्टिकल व मुलाखत , या सगळ्यांना आज महाविद्यालयात जाता आलं नाही . याकडे लक्ष द्यायला हवे अशी बस मधून रोज ये जा करणाऱ्या विद्याथ्यांची मागणी आहेंत.

57 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close