विदर्भ

पोषण आहार चळवळ अंतर्गत झडशी च्या अंगणवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.!

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १९ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या झडशी येथील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार महिना उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात अंगनवाडीतील समस्त बालक, सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला,सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य व इतर नागरिकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात सर्वप्रथम किशोरी मुलींची सायकल यात्रा काढून जनजागृती केली यावेळी आरोग्याविषयी कळकळीचे आव्हान करण्यात आले व गृह भेटीतून जागृती करण्यात आली.मांतासाठी एक मिनिट प्रश्न मंजुषा स्पर्धा घेऊन पोषण विषयी स्पर्धा घेण्यात आली, याच विषयी किशोरी सभा घेऊन घेऊन त्यांना शारीरिक बदलाविषयी प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे दुसऱ्या भागात बालगोपाल यांची पंगत घेण्यात आली. मूठभर धान्य उपक्रमाअतर्गत गावातून गावातील सरपंच, उपसरपंच व महिला गटाच्या सदस्यच्या उपस्तीतीत गावातून लोकवर्गणी गोळा करण्यात आली. यावेळी विविध मेळावे ,सभा, दिंड्या, मार्गदर्शन सभा व जनजागृती कार्यक्रम घेऊन पोषण महामहिना साजरा करण्यात आला ,या कार्यक्रमात सरपंच शुभांगी हळदे, उपसरपंच अतुल वैरागडे, सदस्य कैलास दरणे, निरंजन सहारे, दुर्गा उईके, वैशाली गौरकर यांचे सह अंगणवाडी सेविका संगीता कोहळे, सुनीता काटवे, सुमित्रा धनविज, मीनाक्षी गव्हाळे, मदतनीस वैशाली शेळके, सुकेशनी साखरकर व सारिका जांभुलकर महिला बचत गटाच्या इंदू ठाकरे, चंदा उडान , विमल गव्हाळे, मंगला मिसाळ, मंगला चौधरी, प्रतिभा घोंगडे,कविता गौरकर,रेखा भुरे व माला रामटेके यांनी सहभाग नोंदविला.

43 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close