ताज्या घडामोडी

मनसे विधानसभा लढविणार..

मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे सोशल मीडियावर संकेत…!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १९ :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष कसून कामाला लागल्याचे दिसत असतांना यात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढविण्या संदर्भात द्विधा मनस्थितीत असल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढविण्याची विनंती पक्षाध्यक्षांकडे केल्या नंतर मनसे निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यातच मनसेचे राज्य उपाध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजु उंबरकर आपल्या सोशल मीडियावर “इतरांना हेवा वाटावा असा मतदारसंघ आपणास घडवायचा आहे, त्यासाठी सज्ज व्हा” असे आव्हानात्मक पोस्ट शेयर करून कार्यकर्त्यांना कामाला लागा असा सल्ला दिल्याने आता मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार हे निश्चित. राजु उंबरकर यांची गेल्या १५ वर्षांपासून ची मेहनत कामे, आंदोलने पाहता या निवडणुकीत मनसे जोरदार लढत देणार यात तिळमात्र शंका नाही.

विदर्भात सर्व जिल्ह्यात मनसे पक्षाची वाताहत असून यवतमाळ जिल्ह्यात राजु उंबरकर यांच्या कार्यशील व आक्रमक शैलीमुळे पक्ष आज ही राजकारणात आपलं स्थान मजबूत करून आहे. गेल्या २००९ व पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांचा टक्का पाहता उंबरकर यांची लोकप्रियता वाढत आहे, सदैव जनसेवा व आपला आक्रमक बाणा ह्या आधारावर या निवडणुकीत राजु उंबरकर विधानसभेवर मनसेचा झेंडा यंदा फडकवतील अशी चर्चा आता मतदारांमध्ये ऐकावयास मिळत आहे.

690 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close