ताज्या घडामोडी

देवळी पुलगाव विधानसभेसाठी भाजपचे तिसरे उमेदवार स्पर्धेत….!!

रविराज घुमे

वर्धा , दि. १९ :- देवळी – पुलगाव विधानसभेच्या मतदार संघातून दोन तगडे उमेदवारांनी जनसंपर्क करीत दोंनदा संपर्क दॊरा आटोपता झाल्यावर आता तिसऱ्या उमेदवाने जनसंपर्क सुरु केल्याने आत भाजपचा नेमका उमेदवार कोण असा प्रश्न पडला आहे .

काँग्रेसचे विद्यमान आमदार रणजित कांबळे याना शह देण्यासाठी भाजप डाव टाकला आहे ,तर मागील निवडणुकीत माजी खासदार सुरेश वाघमारे यांचा 900 मतांनी निसटता पराभव झाला,पुन्हा वाघमारे यानी जनसंपर्क सुरु केला आहे ,तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी विकास कामाचे भुमीपूजन करीत उमेदवारी पक्की असल्याचे सांगत आहे . या दोन्ही नेत्याच्या गटबाजी उफळात असताना गटबाजी थोपविण्यासाठी नवा उमेदवार विष्णुगुप्त श्रीनिवास वैद्य यांनी जनसंपर्क सुरु केली आहे.
विष्णूगुप्त वैद्य हे राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रवक्ते मा गो वैद्य यांचे नातू असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे सूत्र कडून कळाले.

मा गो वैद्य हे मूळचे तरोडा येथील असून तरोडा हा भाजपसाठी जिल्हा परिषद मतदारसंघ बालेकिल्ला आहे मागील निवडणूक अपवाद वगळता सतत या भागातून चारदा भाजपचा उमेदवार निवडून आला.

विष्णूगुप्त वैद्य यांचे प्राथमीक शिक्षण तरोडा तेथे झाले आहे ,तर नागपूर विद्यापीठत विध्यर्थ्याचे दोनदा नेतृत्व केले आहे , २०१३ -१४ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
चे नागपूर महानगर सहमंत्री काम केले२०१५ पासून सहायक, सुश्री उमा भारती माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्षा, भाजपा यांचे ते सहाय्यक म्हणून काम करीत आहे.
देवली पुलगांव विधानसभा क्षेत्रात शासनाच्या योजना कार्यान्वित करत भाजपातील गटबाजी संपविण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा गो वैद्य यांनी नेहमी गावासाठी आणि ,समाजाभिमुख कामे केली त्याच्या विचारणा पुढे नेण्याचे काम करण्यासाठी उमेदवारी मागत आहे, असे म मराठी शी बोलताना सांगितले.

367 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close