अपघात

कळंब येथे मयूर धाब्या जवळ अपघातात दोन व्यक्ती ठार

रूस्तम शेख

कळंब , दि. १९ :- कळंब येथे मयूर ढाब्याजवळ दुचाकी व इंडिका यांची धडक झाल्याने दोन व्यक्ती ठार झाले .

याबाबत सविस्तर वृत्त अशी की रात्री दहा वाजता दरम्यान महेंद्र गुलाब उईके वय २४ रा कामटवाडा व सुनील वासुदेव कांबळे वय ४४ वर्ष राहणार कामठवाडा हे दोघे ही दु चाकीने (MH -32-6793) कळंब वरून कामठवाडा येथे जात असताना विरूद्घ दिशेने येणाऱ्या इंडिका (क्र MH -32-AH-1850) या गाडीने
धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघाता मध्ये महेद्र गुलाबराव उईके हा जागीच ठार झाला तर सुनील वासुदेव कांबळे हा गंभीर जखमी झाल्याने याला शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे नेत असतांना मडकोण्या जवळ सुनिल वासुदेव कांबळे याचा मृत्यु झाला पुढील तपास ठाणेदार विजय राठोड करीत आहे.

133 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close