प.महाराष्ट्र

श्रीसंत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊलींचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार

माऊलींच्या आशीर्वादाने खटाव माण चा दुष्काळ दूर होणार – डॉ येळगावकर

सतीश डोंगरे

सातारा / मायणी , दि. १९ :- दरवर्षी श्रीसंत सद्गुरू मातोश्री सरुताईं यांना आम्ही भागातील दुष्काळ हटवा म्हणून साकडे घालत होतो याप्रमाणे माऊलींच्या आशीर्वादाने खटाव माण साठी असणाऱ्या पाणीयोजना पूर्णत्वास जात असून या भागात पर्जन्यमान ही चांगले झाले असून यापूढेही ट्रस्टच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे उद्गार ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी काढले.


श्री संत मातोश्री सरुताई यांच्या सातव्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या मुख्य दिवशी असणाऱ्या रथोत्सव च्या पूजना प्रसंगी बोलत होते यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई,हरणाई सुतगिरणीचे रणजित देशमुख,पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे,संदीप पोळ,जि प चे माजी अध्यक्ष सुभाष नरळे , बाळासाहेब मासाळ,काकासाहेब मोरे,राजुभाई मुलाणी,चंद्रकांत पवार,सत्यवान कांबळे,माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी सौ. देशमुख,विकल्पशेठ शहा,ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शेवाळे,जनार्धन देशमुख,विजय कवडे,जगन्नाथ भिसे, प्रदीप शेटे ,संजय गुदगे,जालिंदर माळी,राजाराम कचरे,भालचंद्र ढवळे,पोलीस पाटील प्रशांत कोळी,शिवाजी वरुडे,शिवाजी लोढे,नागेश यादव,ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मायणीच्या श्री संत सरुताई माऊली यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रथ सोहळा भक्तीमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आज भल्या पहाटे ४ वाजून ३२ मिनीटांनी हजारो भाविकांचे उपस्थितीत मातोश्री सरुताई माऊली यांच्या समाधीवर फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सरुताई भक्त वंदना लिपारे लिखित ‘भाव वंदना’ हा काव्य ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारी १२वांजता माजी आ.डॉ. श्री.व सौ. दिलीप येळगांवकर यांचे हस्ते रथ पूजन व महाआरती झाल्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली सरुताईंच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. रथापुढे मिरवणूकीत झांज,गजी पथक, हत्ती,घोडे, उंट,भजनी मंडळ तसेच टाळ मृदुंग वादक आदींचा सामावेश होता. ठिकठिकाणी भाविक अत्यंत भावपूर्वक रथावर देणगी अर्पण करीत होते ,महिला ओवाळत होत्या. रात्री उशीरा रथ ग्रामप्रदाक्षिणा करुन मठामध्ये आला.
मठ परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मायणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी व त्यांचे सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रथसोहळा यशस्वी करण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे विशाल चव्हाण, त्यांचे स्वयंसेवक यांनी तसेच ट्रस्ट संयोजकांनी ,स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

53 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close