ताज्या घडामोडी

देवाणं धाडला आई – बहिणीला शिव्या देणारा माणूस….!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १९ :- शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री किशोर तिवारी यांनी घाटंजी येथील महिला तहसीलदार व दोन महिला कर्मचारी यांना अत्यंत अर्वाच्च शब्दात बोलून त्यांचा अपमान केला आहे. सदर ही घटना 18 तारखेला घडली व कुठलेही कारण नसताना त्यांनी अपमान केला.

वरील या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,अवल कारकून, तलाठी,लिपिक,वाहन चालक,शिपाई,कोतवाल उद्या दिनांक 20 रोजी कामबंद आंदोलन करीत आहेत. तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनी या कामबंद आंदोलनात सहभागी होऊन आपल्या महिला भगिनींचे पाठीशी उभे राहावे असे आव्हान केले असून उद्या कार्यालयात स्वाक्षरी करून ज्यांना शक्य असेल त्यांनी पोस्टल ग्राउंड येथे सकाळी 10 वाजता पर्यंत उपस्थित राहावे . ज्यांना यवतमाळ येथे येणे शक्य नसेल त्यांनी स्थानिक ठिकाणी आंदोलन करून निषेधाच्या बातम्या वृत्तपत्राला द्याव्यात आणी जाणे येणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळ येथे पोस्टल ग्राऊंडवर उपस्थित रहावे , तसेच मस्टरवर स्वाक्षरी करून उद्या शक्य नसेल तर परवा करावी , मात्र अशा मुजोरीचा बुरखा फाटला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणे हिंकाळाची गरज असून आपल्या आई बहिणीला कुठलाही नेता शिव्या देता कामा नये म्हणुन एकजूट मजबूत अशा घटनांमधून सर्वांनी एेकी केली पाहिजे.

245 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close