sport

सेंट झेवियर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश..

अमीन शाह

बुलडाणा , दि. २० :- शेगाव येथे१६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शेगाव येथील सेंट झेव्हियर इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थिनी कु. यशिका प्रदीप राठी हिने१७ वर्षे वयोगटा मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकविला आहे तर आदित्य सुरेश गोळे या विद्यार्थ्यंने १४ वय वर्ष गटात जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

दोन्ही विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने पुढच्या अमरावती येथे विभागीय स्तरावर होणार स्पर्धांसाठी त्यांची निवड झालेली असून या स्पर्धेमध्ये ही यश हमखास मिळेल असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थी यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व आई-वडिलांना देतात.

44 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close