परभणी

डिपॉझिट भरण्यासाठी पैसे नसल्याने अपक्ष उमेदवारांची मागणी…!!

दुष्काळी अनुदानाचे पैसे विधानसभा डिपॉझिट मध्ये वर्ग करा….!!

परभणी / गंगाखेड , दि. २७ :- गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊनही आजपर्यंत हेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये प्रमाणे येणारे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी लागणारे डिपॉझिट शासनाने दुष्काळग्रस्त अनुदानातून वळते करत त्यातुन डिपाजीट भरत माझा उमेदवारी अर्ज स्वीकारावा अशी मागणी गंगाखेड विधानसभेसाठी इच्छुक अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कडे केली आहे.

शुक्रवार 27 सप्टेंबर निवडणुकीचे अर्ज मिळणे व अर्ज भरण्याचा पहिला दिवस. अकरा वाजताच इच्छुक उमेदवार व समर्थक कार्यकर्त्यांनी निवडणूक अर्ज मिळण्याच्या कक्षात गर्दी केली होती. त्याच वेळी विधानसभेसाठी इच्छुक असलेले अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे यांनी उमेदवारी अर्ज मागण्याच्या अर्जा सोबतच स्वहस्ताक्षरात एक लेखी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केला. अर्जात माझ्याकडे साडेचार एकर शेती पडेगाव शिवारात असून हेक्‍टरी सहा हजार रुपये प्रमाणे सुमारे 12 हजार च्यावर दुष्काळी अनुदान मिळणे अपेक्षित आहे. पण ते अनुदान आजपर्यंत माझ्या बँकेच्या खात्यावर जमा झाले नाही. तरी आपण मला येणारे दुष्काळी अनुदान निवडणूक विभागाच्या डिपाजीट रक्कम स्वीकारण्याचा कक्षात वर्ग करून माझा उमेदवारी अर्ज स्वीकारावा. आदी मागण्याचा अर्ज केला उमेदवारी अर्ज वाटप कक्षातील कर्मचारी हा अर्ज पाहून चक्रावून गेले. काय उत्तर द्यावे कळेनासे झाल्याने हे कर्मचारी स्वतः तो अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे गेले. सुधीर पाटील यांनी सुरुवातीस आपल्या मागणीप्रमाणे आम्हाला बदल करता येत नसल्यामुळे हा अर्ज स्वीकारणार नसल्याचे सांगितले. तेवढ्यात जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी गंगाखेड येथे भेट देण्यासाठी आले असता उमेदवार सखाराम बोबडे यांनी हा अर्ज थेट जिल्हाधिकारी कडे दिला. तेवढ्यात निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी आपणास लेखी देतो व अर्ज स्वीकारतो असे सांगितले. थोड्यावेळाने निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी हा अर्ज स्वीकारत या अर्जाची पोच पावती दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चार तारखेपर्यंत वेळ असला तरी या अर्जावर निवडणूक विभाग काय काय कारवाई करतो याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

2,367 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close