Home जळगाव एरंडोल भुमी लेख कार्यालयास टाळे ठोक आंदोलन

एरंडोल भुमी लेख कार्यालयास टाळे ठोक आंदोलन

166

_आर पी आय आठवले गट च्या इशारा_
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील
एरंडोल येथील भुमी अभिलेख कार्यालयास अतिशय भोंगळ कारभार सुरू असून अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे अर्जदाराचे अर्ज महिन्यापासून दाखल असताना अर्जदारांनी त्याची पोच घेतली असताना एरंडोल भाग कर्मचारी श्री एस एन पाटील अर्जदारांना बेजबाबदारपणे उत्तरे देऊन नागरिकांना फिरवा फिरवी करीत आहे ऑन ड्युटी दारू पिलेले असतात व त्या धुंदीत तुमचे अर्ज कुठे आहेत माझ्याकडे आलेली नाही शेवटी असे सांगतात प्रत्यक्षात नागरिकांची अर्ज त्यांच्याकडे असतात कार्यालयात नेहमीच अर्जदारांची गर्दी असते बाचाबाची होत असते यामुळे नागरिक हैराण झाले आहेत कार्यालयातील जबाबदार अधिकारी सुद्धा याकडे जाणून-बुजून कानाडोळा करीत आहे
एकीकडे महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिक कोरोना संसर्गजन्य आजारात युद्धपातळीवर सामना करीत असताना तसेच अतिदक्ष कर्तव्यदक्ष जबाबदार अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या आदेश काढलेले असताना मात्र दुसरीकडे एरंडोल भुमिअभिलेख कार्यालयास नेहमी अर्जदारांची गर्दी असते तरी सदर चा प्रकाराकडे आपले लक्ष केंद्रित करण्याचे व नागरिकांचे कामे वेळेवर करायला पाहिजेत या हेतूने आपल्या एरंडोल भुमिअभिलेख कार्यालयास उपरोक्त संघटना तर्फे टाळे ठोक आंदोलन दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता करण्यात येणार आहे होणाऱ्या परिणामास सदर हू कार्यालयातील संबंधित अधिकारी जबाबदार राहतील कृपया याची नोंद घ्यावी असे लेखी अर्ज आरपीआय आठवले गट यांनी उपविभागीय अधिकारी एरंडोल पोलीस ठाणे अंमलदार एरंडोल पोलीस स्टेशन यांचेकडे लेखी अर्ज दिले आहे या अर्जावर एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ बाविस्कर तालुका सचिव देवानंद बेहरे तालुका उपाध्यक्ष सिताराम आनंदा मराठे तालुका सरचिटणीस गजानन नथू पाटील कासोदा शहराध्यक्ष मजिद खा बेलदार बबन सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदर प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय आठवले गट नाम्दार रामदासजी आठवले साहेब जिल्हा अधिकारी साहेब जळगाव आयुक्त भुमिलेख नाशिक उपविभागीय अधिकारी एरंडोल तहसीलदार एरंडोल पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन एरंडोल जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव तालुका भुमी अभिलेख एरंडोल.