Home जळगाव *धरणे कर्फ्यु चा ७८ वा दिवस* *फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ऑल इंडिया...

*धरणे कर्फ्यु चा ७८ वा दिवस* *फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ऑल इंडिया यांचा सक्रिय सहभाग*

594

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा शुक्रवार हा ७८ वा दिवस या दिवसापासून या धरणे आंदोलनास *धरणे कर्फ्यू* असे संबोधण्यात येईल असे आव्हान मंचचे समन्वयक फारुक शेख यांनी धरणे सुरू होताच उपस्थितांसमोर केले व आलेल्या गर्दीला विनंती करून सांगितले की शुक्रवारपासून आपल्या धरणे आंदोलनात कर्फ्यू लावला असून आज पासून आंदोलन मंडपात फक्त पाच ते दहा पुरुष व महिला बसतील बाकीचे आलेल्यांनी कृपया या स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवावा.
तसेच मंडपातील आंदोलकांना पंधरा पंधरा मिनिटात मुक्त करण्यात येत होते अशाप्रकारे कर्फ्यु आंदोलनाला सुरुवात झाली.
*आंदोलनाची सुरुवात*

फारुक शेख यांनी पवित्र कुराण पठण केल्यावर आंदोलनास सुरवात झाली फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ऑल इंडिया( एफ एम आर ए आय) यांच्या जळगाव शाखेच्या प्रतिनिधींनी आज सक्रिय सहभाग नोंदविला यांचे सचिव रितेश यांनी मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र केले जनता कर्फ्यू सोबतच त्यांनी कठोर निर्णय घेणे आवश्यक होते त्याच प्रमाणे ज्यांना संसर्ग झालेला आहे त्यांनासुद्धा ठोक मदत देण्यास पाहिजे होती एवढेच नव्हे तर वैद्यकीय सेवे सोबतच मास्क, सैनीटायझर व इतर औषधोपचार उपलब्ध करून द्यावयास पाहिजे होता ते न करता त्यांनी या आजाराचे एक इव्हेंट केल्याची टीका रितेश यांनी केली.
संघटनेचे अमोल कुलकर्णी यांनीसुद्धा देशातला सर्वात मोठा व्हायरस जर असेल तर तो एन पी आर, एन आर सी व सी ए ए असल्याचे परखड मत मांडले करीम सालार यांनीही ही मार्गदर्शन केले.

एम आर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तर्फे आंदोलनामध्ये सहभागी होणारे आंदोलकांचा साठी सैनीटायझर व मास्क उपलब्ध करून दिले व ते मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख यांना आंदोलनस्थळी देण्यात आले.
*निर्भया च्या दोषींना फाशी दिल्याने आनंदस्तोव* आंदोलनस्थळी निर्भयाच्या दोषींना अखेर आज फाशी दिली गेल्याने आंदोलकांनी आनंद व्यक्त केला त्यावेळी आंदोलकांचा तर्फे नजमा हुसेन यांनी हा प्रस्ताव सादर केला असता त्यात रुबीना शेख सुलताना युनूस ,सकीना इस्माईल सबनूर हैदर ,फर्जाना आयुब ,शबीना हरीश, मारिया फातेमा, जवेरिया सय्यद यांनी टाळ्याच्या गजरात त्यास दुजोरा दिला व उपस्थितांनी उशिरा का होईना दोषींना शिक्षा झाल्याचे समाधान व्यक्त केले..
*आंदोलकांनी रस्त्यावर लाइन लावून केल्या स्वाक्षऱ्या*

कर्फ्यु आंदोलन सुरू झाल्याने आंदोलनस्थळी येणाऱ्या आंदोलकांच्या मंडपाबाहेर ठरावीक अंतर सोडून स्वाक्षरी घेण्यात येत होत्या. स्वाक्षरी झाल्यानंतर आपण या आंदोलनात सहभागी आहात आपण पण घरी जावे अशी विनंती केल्यावर उपस्थित पुरुष व महिला यांनी काही वेळ आंदोलन स्थळी थांबुन ते आपल्या घरी परतले.
त्यात प्रामुख्याने शेख सलीम अन्वर सिकलिगर अजिज शिकलकर, अनीस शाह,ताहेर शेख, अल्ताफ शेख, शेख वसीम, आरिफ शेख ,खलील टेलर, तनवीर अहमद, प्राध्यापक इकबाल शाह,कादिर खान, बादशाह सय्यद, आसिफ शेख, फरीद शेख ,मोहम्मद अजहर, अशपाक शाह, युसूफ खान जलीस खान, गुलाम दस्तगीर, शेख अमीर,मुजाहिद सय्यद ,सत्तार सय्यद, अर्षद अली, फरहान खान, महबूब शेख, सद्दाम वसीम, हसन रेहान अली, आमीन शेख ,आशिक मणियार, जाफर सत्तार, इब्राहिम मोहम्मद, मिर मुषर्रफ, तनवीर सैय्यद, अश्फाक शेख आदींचा समावेश होता.
*यांची होती उपस्थिती*

एम आर संघटनेचे परवेज खान, जलीस खान ,अझहर शेख, मोहसीन खान, मिर मुषर्रफ, वसीम सय्यद, आरिफ शेख, इमरान शेख, कलीम शहा, आसिफ मणियार, वसीम शेख, समीर खान ,गफ्फार मलिक आदींची उपस्थिती होती.

नजमा शेख हुसेन यांच्या नेतृत्वात महसूल विभागाचे नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.