परभणी

धनगर आरक्षणासाठीच गंगाखेड विधानसभेच्या रिंगणात- सखाराम बोबडे पडेगावकर

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

गंगाखेड , दि. ०३ :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघात बहुसंख्येने असलेल्या धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा असलेला धनगर आरक्षण अंमलबजावणी हा प्रश्न सोडवण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
ते गुरूवारी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. बोलताना सखाराम बोबडे म्हणाले की आज तारखेपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज प्रमाणे एकाही उमेदवाराकडे लोकसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव नाही. एक दोन उमेदवार सोडले तर बाकीचे विधानसभेसाठी नवीनच आहेत. मी स्वतः लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली असल्याचा अनुभव माझ्याकडे आहे. या अनुभवाच्या जोरावरच धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा असलेला धनगर आरक्षण अंमलबजावणी चा प्रश्न सोडविण्यासाठीच मी गंगाखेड विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे. गंगाखेड मतदार संघात मेंढ्या वळणाऱ्या धनगर समाजाची संख्या जास्त आहे पण त्यांच्या एकाही प्रतिनिधीस राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही. आजपर्यंत आश्वासन देऊनही न मिळालेलं आरक्षण व प्रमुख राजकीय पक्षाकडून समाजाची झालेली उपेक्षा याचा राग या मतदार संघातील समाज मला मतदान करून व्यक्त करतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

259 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close