परभणी

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी कडून सखाराम बोबडे रिंगणात

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

गंगाखेड , दि. ०४ :- लोकनेते लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी कडून धनगर आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षातून बाहेर पडत उपराकार लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी पक्षाची स्थापना केली होती. धनगर आरक्षण चळवळीत काम करण्याचा अनुभव व लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुभवाच्या जोरावर सखाराम बोबडे पडेगावकर यांना लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा ए व बी फार्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या पंधरा मिनिटात देण्यात आला. उद्या शनिवारी होणाऱ्या छाननी नंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी आज सखाराम बोबडे यांनी मिळवलेल्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळे विधानसभा मतदारसंघातील सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगातील गणित बदलणार आहेत एवढे मात्र निश्चित. सखाराम बोबडे यांनी काल आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

486 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close