बुलढाणा

मानमोडी येथील समस्या ग्रस्त शेतकऱ्यांची रयतने घेतली भेट

अमीन शाह

चिखली , दि. ०७ :- तालुक्यातील घानमोड मानमोड या गावी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या विषयी शेतकऱ्यांशी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या गेल्या दहाबारा वर्षांपासून मानमोडी, घानमोडी या गावचा पुनर्वसन प्रश्न प्रलंबित असून वेळोवेळी येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधीशी सँम्पर्क करून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगवेगळी आंदोलने,उपोषणे, निवेदने देऊनही पूर्णपणे गावचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न केलेला आहे तरी ही हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही.

चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार ही टाकला होता ,परंतु लोकप्रतिनिधींनी आश्वासन देऊन सदर गावकऱ्यांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यापासून स्थानिक नागरिकांना प्रवृत्त केले होते व त्या प्रमाणे त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा ही केला होता पण आजरोजी पैंनगंगा नदी पूर्णपणे भरलेली असल्याने शेतकऱ्यांना नदीच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या शेतातील पीक काढणी साठी मजुरांना ने आन करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्रात एक होडी तयार करून जीवावर उद्धार होऊन शेतीच्या कामासाठी जीवघेणा प्रवास नदीतून करावा लागत आहे.
बहुसंख्य शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या दुसऱ्या बाजूने असल्याने शेतात जाण्या येण्या साठी कायम स्वरूपी अशी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी पूल असावा अशी मागणी आहे व प्रलंबित पुनर्वसन प्रश्न तात्काळ मार्गी लागावें अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांची असल्यानेे त्यांनी रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी कडे केली आहे व त्यांनी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून सदर समस्या सोडवून घेऊ असे सांगितले आहे,याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे
किसान आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक खरात, विध्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाकडे,तालुका अध्यक्ष सचिन काकडे,युवा ता अध्यक्ष गोपाल पाटील,सरचिटणीस दत्ता आष्टीकर, यशपाल लहाने,सचिन झालटे ,जिवन जाधव,राजेंद्र जाधव,अमोल जाधव,अनिल जाधव,गणेश जाधव आदी उपस्थित होते.

43 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close