मराठवाडा

किनवट विधानसभा निवडणूक करीता शेवटच्या दिवशी दहा जणांची माघार तर पंधरा उमेदवार रिंगणात.

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०७ : – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता ८३- किनवट विधानसभा मतदारसंघाअंतर्गत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी (दि.७ ) दहा जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून एकूण पंधरा उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३८ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली व छाननीमध्ये सहा नामनिर्देशन अवैध झाले होते.

पंचवीस वैध उमेदवार होते. त्यानंतर नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी ( ता. सात ) दहा जणांनी अर्ज मागे घेतल्याने पंधरा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत.
नामनिर्दिष्ट उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार असे : किशन विठ्ठलराव मिराशे ( अपक्ष ), संदीप बाबुराव कराळे (अपक्ष ), किशन दामा राठोड ( अपक्ष ),
जाधव यादव लिंबाजी ( अपक्ष ), संध्या प्रफुल्ल राठोड ( अपक्ष ), धनेश्वर भारती गुरू आनंद भारती ( अपक्ष ), धरमसिंग दगडू राठोड ( अपक्ष ), दत्ताये नारायण पिटलेवाड ( अपक्ष ), ज्योतिबा जयरामजी खराटे ( अपक्ष ), सचिन माधवराव जाधव ( अपक्ष ),
निवडणूकीत असलेले वैध उमेदवार असे : संदीप विजयराव निखाते (बहुजन समाज पार्टी ), भिमराव रामजी केराम ( भारतीय जनता पार्टी ), प्रदीप हेमसिंग जाधव ( नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी ), विनोद मोहन राठोड ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ), संतोष माधव अडकिने ( बहुजन मुक्ती पार्टी ), शादुला अहेमद शेख ( बळीराजा पार्टी), स.इमरान सली स.अहेमद अली ( इंडियन युनियन मुस्लीम लीग ), मिरची महाराज धरमदास त्रिपाठी ( जय जवान जय किसान पार्टी ), विशाल दत्ता शिंदे (संभाजी ब्रिगेड पार्टी ), प्रा.डॉ.हमराज उदयभान उईके ( वंचित बहुजन आघाडी ), अनैद्दीन फय्याजोहीन शेख (अपक्ष ), अॅड. प्रदीप देवा राठोड (अपक्ष ), माधवराव सुदामजी मरसकोले ( अपक्ष ), राजेश नारायण धावारे (अपक्ष ), वलकुलवाड कोंडबा मारोती (अपक्ष )

27 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close