नांदेड

शेतात काम करीत असताना महीलेला सर्प दंश झाल्याने मृत्यु.

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ०८ :- तालुक्यातील मौजे गोंडवडसा येथील शेतकरी शे.अब्दुल जानी यांची पत्नी जुबेदा शे.जानी वय ५४ वर्षे ह्या आपल्या शेतात काम करीत तिच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला. तिला माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले.तिथे डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक इलाज करून तिला पुढील उपचारांसाठी यवतमाळला हलविले. दि.२ ऑक्टो.ला दु. १:३० वाजण्याचे सुमारास तिचा मृत्यु झाला.
शे.जुबेदा यांचे पश्चात पती, दोन मुलं,चार मुली दोन सुना असा परिवार आहे. याबाबत सिंदखेड पोलीस स्थानकात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून येथील कृषी साह्यक सुधीर राजुरकर यांनी सदर घटनेच्या पंचनाम्यास मदत केली.

70 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close