प.महाराष्ट्र

कधीच पक्ष  विरोधी काम केले नाही , आणि करणार ही नाही – तानवडे

वागदरी / नागप्पा आष्टगी

सोलापुर , दि. ०८ :- माझ्या आयुष्यात कधीच पक्ष विरोधी काम केलो नाही ,या पुढेही करणार नाही असे प्रतिपादन जि प पक्ष नेते आनंद तानवडे यांनी पोलीस वाला शी बोलताना केले.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे वाढ दिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमा नंतर तानवडे बोलत होेते.मागील काही महिन्यापासुन आ.सिध्दाराम म्हेत्रे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा झाली.या वेळी आ.म्हेत्रे याना उमेदवारी मिळावी म्हणुन कधीच पक्षश्रेष्ठीकडे शिपारस केलो नाही.स्वत: आ.म्हेत्रे यांनीच भाजपामधील वरिष्ठ नेत्याची जवळीक साधले .जि प अध्यक्ष निवडणुकीत ,सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मदत केले.मात्र गेल्या एक महिन्यापासुन विनाकारण माझा बदनामी करण्याचा प्रश्न सुरू आहे.सोशल मिडीयावरून नको ते आरोप होत असताना ,तालुका भाजप पदाधिकारी त्यांना रोखण्यांचा प्रश्न केला गेला नाही , त्यामुळे मी निराशा झालो आहे .

तानवडे कुंटुबिय कधीच पक्ष विरोधी काम करणार नाही .तसे झाल्यास स्व.बाबासाहेब तानवडे यांचे ते अपमान आहे असे तानवडे म्हणाले.पक्षाने मला सर्व काही दिले आहे .मी पक्षासाठी काम करत रहाणार असल्याचे स्पष्ठ केले .तालुक्यातील काही लोकानी सतत आमचा द्वेश करत आहे.जि प निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केले.आता परत तेच आमचे बदनामी करत आहे.हे योग्य नाही.असे तानवडे म्हणाले .या वेळी पंचायत समिती विरोॆधी पक्ष नेते गुंडप्पा पोमाजी ,गोगांवचे सरपंच प्रदिप जगताप ,बसवराज पाटील ,महादेव सोनकावडे,निवृती सुरवसे ,कणमुसे गणपती भोसले,आदी उपस्थित होते.

218 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close