अहमदनगर

भंडारदरा परिसरात वन्यजीव सप्ताह संपन्न.

राजूर – ललित मुतडक

अहमदनगर , दि. ०८ :- सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अथांग अशी वनसंपदा निसर्गाने भरभरुन दिली असुन या निसर्गसृष्टीत वन्यजीव जगले तरच मानवाचे अस्तित्व टिकुन राहील अन्यथा मानवजातीचा सर्वनाश होण्यास विलंब लागणार नाही असे उद्गार नासिक येथील वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी वन्यजीव विभागाच्या ” वन्यजीव सप्ताह ” च्या सपारोपाप्रसंगी काढले.
दरवर्षी भारतामध्ये १ आक्टोबर ते सात आक्टोबर या कालावधीमध्ये’ वन्यजीव सप्ताह ‘साजरा करण्यात येत असतो.त्याचाच एक भाग म्हणुन भंडारद-याच्या कळसुबाई हरिषचंद्र अभयारण्याच्या घनदाट जंगलाच्या अभयारण्यामध्ये ‘वन्यजीव भंडारदरा ‘ विभागाकडुन ‘ वन्यजीव सप्ताह ‘ साजरा करण्यात आला.वन्यजिव सप्ताहाच्या कालावधीमध्ये भंडारदरा वन्यजीव विभागाकडुन प्राणी व पक्षी सदंर्भात निबंध स्पर्धा,व चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.तसेच अभयारण्य क्षेत्रामध्ये रविंद्र सोनार,बालिका फुंदे यांच्या अधिपत्याखाली वृक्षारोपन,झाडांचे संवर्धन कसे करावयाचे,वन्य प्राण्यांना कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेत त्यांच्यापासुन स्वत:चे सरक्षण कसे करावयाचे,सर्पाविषयीचे समज गैरसमज,वन्यजीव वाचविण्यासाठी शालेय मुलांची प्रत्येक गावातुन प्रभात फेरी काढण्यात आल्या.
सात दिवस चाललेल्या या’ वन सप्ताहाची सांगता सोमवारी वन्यजीव विभागाचे प्रमुख वनसरक्षक अधिकारी अनिल अंजनकर यांच्या अध्यक्षतेखाली भंडारदरा येथील वनविभागाच्या विश्रामगृहावर पार पडला. यावेळी अंजनकर म्हणाले कि मानवाच्या अस्तित्वासाठी वन् जीवांचं विशेष योगदान असून वन्य जीवन जगले तरच जंगलाचे संरक्षण होईल,आणि जंगल टिकले म्हणजेच निसर्ग टिकला तरच मानव टीकेल.आदिवासी बांधवांचे जिवन उंचावण्यासाठी वनविभाग कायमच अग्रेसर राहील.शालेय विद्यार्थ्यांनी बॅटने या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्याबद्दल वनविभाग कायमच त्यांचा ऋणी राहील.तर नासिक येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वाडेकर यांनीही वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो याची कल्पना विद्यार्थ्यांना करून दिली.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे यांनीही विद्यार्थ्यांना वन्यजीवां विषयी विशेष अशी माहिती दिली.भंडारदरा वन्यजीव विभागाचे प्रमुख डी डी पडवळे यांनीही वन्यजीव वाचविण्यासाठी आम्ही कुठेच माघार घेणार नाही याची ग्वाही दिली.या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी वन्यजीवांची रेखाटलेली छायाचित्रे व निबंध स्पर्धेत चांगली कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले तर प्रमुख उपस्थित पाहुण्यासाठी हार तु-यांना फाटा देत वृक्षांची रोपे व पुस्तके दिली.तर नुकतेच नासिक येथुन बदलुन आलेले वनपाल रविंद्र सोंनार यांना नासिक विभागाने दिलेल्या विशेष पुरस्काराबद्दल भंडारदरा येथे गौरविण्यात आले.
वन्यजीव सप्ताह पुर्णत्वास नेण्यासाठी भंडारदरा वन्यजीव विभागाचे रविंद्र सोनार, सचिन धिंदळे,नाथु ढगे,वनरक्षक बालिका फुंदे,राजेंद्र आहिरे,दत्तु भोये,गुलाब दिवे,गोंविंद आढळ,संजय गिते,महेंद्र पाटील,दत्तु सदगिर यांनी विशेष प्रयत्न करुन वन्यजीव सप्ताह हा उपक्रम जीवाचे रान करत पार पाडला…

41 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close