जळगाव

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या बांबरुड राणीचे या गावात शिवसेना युवानेते सुमित किशोर पाटील यांचा झंझावात.

निखिल मोर

पाचोरा , दि. ०८ :- येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवसेना युवानेते सुमित किशोर पाटील यांनी आज थेट माजी आमदार दिलीप वाघ यांच्या बांबरुड राणीच्या गावात धडक मारून झंझावती प्रचार रॅली काढत आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेना युवानेते सुमित किशोर पाटील हे युवासेनेच्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत मतदार संघ पिंजून काढीत आहेत. आज त्याचाच भाग म्हणून त्यांनी राणीच्या बांबरुड येथील परिसरातील विविध भागांना जाऊन जनतेचे आशिर्वाद घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात त्यांचे सोबत जि.प.सदस्य पदमसिंग पाटील,डी.के.आप्पा पाटील, किशोर आढाव, जितू पाटील, भागवत पाटील,समाधान पाटील, निलेश गवळी,तुषार आढाव, अवि पाटील,रोहित पाटील, सुनील पाटील, करणसिंग पाटील,विक्की राजपूत,सचिन राजपूत, युवराज काळे,सागर पाटील, विनोद आप्पा पाटील,साहेबराव पाटील,प्रकाश पाटील,किरण गोराडे, विनोद कोकणे,संतोष पवार,बबलू जगताप,देवा सोनार,मुबाद तडवी, प्रकाश चौधरी,भास्कर जगताप,रवींद्र पाटील,गोपाल पाटील, संग्राम पाटील,युगल सोनार,शिवाजी परदेशी ग्रामस्थ,शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

56 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close