रायगड

नृत्य सादर करून आमदार भरतशेठ गोगावले यांनी जिंकली उपस्थितांची मने

महाड – जुनेद तांबोळी

रायगड , दि. ०८ :- महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले निवडणूक प्रचारादरम्यान सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देत आहेत . यादरम्यान देवीचे दर्शन घेऊन नवरात्र उत्सवातील गरबा नृत्य खेळत आमदार गोगावले यांनी सामान्य रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले.या दौऱ्यामध्ये नांदवी कुंभारवाडा, गोरेगाव, या ठिकाणी भाविकांमध्ये सहभागी होऊन आई तुझे देऊळ या गाण्यावर नृत्य केले .
या दौऱ्यामध्ये माजी जिल्हा प्रमुख विजय खुळे आमदार भरतशेठ गोगावले माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांच्यासमवेत महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

सामान्य जनतेमध्ये मिसळणारा आपला माणूस आपला आमदार म्हणून आमदार गोगावले यांची ओळख निवडणूक प्रचारादरम्यान देखील कायम असल्याचे दिसून येत आहे वेशभूषा केलेल्या कलाकारांचे देखील आमदार गोगावले यांनी कौतुक करत कलाकारांना व्यक्तिगतरित्या बक्षीस दिली.
राजकीय आखाड्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या चालू असताना आमदार गोगावलेंनी आपल्या प्रचारामध्ये सामान्य जनतेला जे आवडेल तेच मी करतो हे आपल्या कृतीमधून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

92 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close