ताज्या घडामोडी

माणुसकीतला माणुस खरचं हरविला की काय??

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

अमरावती , दि. ०९ :- दि.6 सप्टें. ला अमरावती येथील गांधी चौक पोलीस चौकी , अंबादेवी संस्थान पोलीस चौकी येथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी , महीला कर्मचारी,व पोलीस कर्मचारी यांना नाश्ता , चहाचे वाटप करतांना काही पोलीस कर्मचारी यांचे सोबत वार्तालाप केले असता अंबादेवी येथील बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नाश्ता नंतर द्या , अगोदर प्यायला पाणी असेल तर द्या अशी पोलीस कर्मचाऱ्यांन कडुन धक्कादायक माहीती मिळाली ,अंबादेवीचे दर्शन घ्यायला जवळजवळ १ कीलो मिटरची लाईन होती.

बरेच महीला , पुरुष आपल्याला होत असलेल्या गैरसोयी , मोबाईल चोरला , पैसे चोरले ,ऐवढेच नाहीतर चप्पल चोरीला गेली याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना माहीती देत होते , पतले नसल्यास शिव्या पण देतो पंरतु जे पोलीस कर्मचारी सतत २४ तास सेवा देतात त्यांना काही लागत काय तेही माणसेच आहेत त्यांनाही पाण्याची जेवणाची गरज पडते हे विचारायलाही आमच्याकडे माञ वेळ मिळत नाही. जो विभाग आपल्या स्वतःच्या कुटुंबीयांच्या समस्येकडे लक्ष न पुरविता सतत २४ तास आपली सुरक्षा व्यवस्थेची ऐवढी काळजी घेतो त्या विभागाचा आमच्या मनात ऐवढा द्वेष का? आमच्यातली माणुसकी संपली काय? अस म्हणायला हरकत नाही, मी माञ खरच अमरावती येथील पोलीस मिञ परिवार समन्वय समीतीचे आभार मानेल व धन्यवाद देईल मला व समीतीच्या पदधिकाऱ्यांना माहीत होताच त्यांनी अगोदर पिण्याच्या पाण्याची कॅन त्वरित पुरविली .

आज सकाळीही पुन्हा पिण्याच्या पाण्याची सोय केली, ऐवढच नाही बंदोबस्त असे पर्यंत पाण्याची कैन पुरवीत राहु अशीही ग्वाही दिली.

मिञानो सांगायचा उद्देश हाच की १० ते ११ कर्मचाऱ्यांचा सेवेचे ताण व वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी , राजकीय ताण आणी सोबतच कुटुंबीयांच्या समस्या, स्व:ताच आरोग्य, पोलीस विभागाच्या मुलभुत गरजा कडेही सतत हेतुपुरस्सर दूर्लक्ष होत आहे.

आपण त्यांना मुलभुत गरजा पुरवु शकत नाही पंरतु आपण त्यांचा थोडासा ताण माञ कमी करु शकतो, यासाठी आपल्या विभागात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी व सकाळपासून काही नाश्ता किंवा जेवण घेतलय काय नक्की विचारा,शक्य झाल्यास देण्याचा प्रयत्न करावा, शेवटी तेही आपल्या सारखेच माणसे आहेत.

44 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close