अपघात

दत्तशिखर – दत्तमांजरी रस्त्यावर घाटात भाविकांचा ऑटो पलटी

मजहर शेख

सात जखमी; भाविक गंभीर रुग्ण यवतमाळ रेफर

नांदेड / माहूर , दि. ०९ :- नवरात्राच्या शेवट च्या दिवाशी विजयादशमी ला रेणुकामाता, भगवान दत्तप्रभू व अनुसया मातेचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या आयटीआय घाटात अपघात होऊन चार भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.ही घटना आज दिनांक ८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान माहूर तालुक्यातील दत्तमांजरी परिसरात घडली.

माहूरगडावरील देवी-देवतांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे ऑटो क्रमांक एम एच २६ ए.के.२०३७ चालकाचा घाटात ताबा सुटल्यामुळे अपघात होऊन ओम बालाजी तोंडे वय १०, नागराज बालाजी तोंडे वय १३, कृष्ण शत्रुघन तोंडे १३, मीरा शत्रुघन धोंडे ३५, हे गंभीर जखमी झाले असून विठाबाई गंगा राम केंद्रे वय ७० मीना विजय होंबळे वय ३५, वैभव विजय होंबळे वय १२, हे किरकोळ जखमी झाले असून या अपघातात जखमी झालेल्या सात जनात चार छोट्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर किरण वाघमारे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ हलविण्याचा सल्ला दिला.

परंतु नेहमीप्रमाणे १०८ रुग्णवाहिका डॉक्टर विना असल्याने अपघातातील जखमींना ती तब्बल दीड तास भर उपलब्ध होऊ शकली नाही. डॉक्टर विना ही गाडी येथून हलणार नसल्याची भूमिका १०८ च्या मॅनेजमेंट घेतल्यामुळे वेदनांनी विव्हळत असलेल्या रुग्णांना दीड तास माहूरच्या रुग्णालयातच तात्काळत थांबावे लागेल. जखमींना मनोज कीर्तने यांनी आपल्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात आणले व रुग्णांना पुढील उपचारासाठी मदत केली.

19 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close