सातारा

खड्ड्यातील रस्ता वाहकांच्या उठलाय जीवावर

मायणी परिसरात खड्यांचे साम्राज्य…

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. १२ :- गेल्या अनेक महिन्यांपासून मायणी तील मिरज -भिगवण राज्यमार्ग तसेच पंढरपूर -मल्हारपेठ रस्ता या दोन्ही रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले मोठं मोठे खड्डे प्रवाशी व वाहकांच्या जीवावर उठले असल्याचे दिसत असून याबद्दल सर्वत्र असंतोष पसरला आहे.
मल्हारपेठ -पंढरपूर हा मायणी गावचा मूळ बाजारपेठ असलेला राज्यमार्ग आहे .सध्या या मार्गाचे नूतनिकरणाचे काम मायणी तलावा पर्यंत व मायणी भारतमाता विद्यालयाच्या पुढे सुरू आहे.परंतु या रस्त्यावरील चांद नदीवरील दोन्ही पुलावर खड्यांचे साम्राज्य असून कृषी विभागाच्या नजीकच्या पुलावरती भलामोठे भगदाड पडले असून सध्या यावर ग्रामस्थांनी काटेरी झुडपे टाकून वाहन चालकांना सतर्क केले आहे. तसेच विटा मायणी रस्त्यावरील माहुली हद्दीवरील खड्याने रास्ता व्यापल्याने ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ट्रक ,चारचाकी वाहनानांचे नुकसान होऊन अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ठिकठिकाणच्या खड्यात पाणी साचल्याने याचा त्रास पादचाऱ्यांना होत आहे. रस्त्याच्या नुतानुकरणाची कामे चालू असली तरीही संबंधित विभागाने जीवावर बेतणाऱ्या खड्यांची मलमपट्टी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
चौकट :- आम्ही दररोज नोकरीच्या निमित्ताने विटा रस्त्याने म्हसवड कडे जात असतो परंतु पावसामुळे रुंदावलेल्या खड्यांमुळे चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान असून यामुळे शाररिक त्रास होत आहे. संबंधित विभागाने खड्याची दुरूस्ती करून वाहन चालकांना दिलासा द्यावा – काकासाहेब महाडिक , नित्य प्रवासी.

106 Views
कृपया शेअर करा
Show More

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close