वाशिम

आदर्श आचारसंहिता भंगाबाबत गुन्हे दाखल….!!

आरिफ पोपटे

कारंजा , दि. 12 :- 35 कारंजा वि.स.म.सं अंतर्गत आचारसंहिता पथकाद्वारे दिनांक 2/10/2019 रोजी मानोरा येथील श्री.नागनाथ किसनराव गायकवाड कार्यालय अधीक्षक, नगर पंचायत मानोरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजकीय नेत्यांचे फोटो असलेले फलक झाकून ठेवले होते ते अज्ञात व्यक्तीने काढून टाकले याबाबत भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 427 अन्वये अज्ञात व्यक्ती विरुद्ध आदर्श आचार संहितेचा भंग केल्या बाबत पो.स्टे.मनोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दि.10/10/2019 रोजी चालू वाहनातून वाहन क्रमांक एम.एच. 37 जि. 4233 (अपे ऑटो) मधून म.न.से. या पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याने फिरते पथक प्रमुख पि.एम.अंधारे,मंडळ अधिकारी,कारंजा यांना आढळून आले त्यांनी सदर वाहन धारक अब्दुल कादर बद्रुद्दिन गारवे,रा.कोळी यांचे विरुद्ध भारतीय दंडविधान 1860 चे कलम 188 अन्वये आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दल शहर पोलीस स्टेशन कारंजा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.दिनांक 10/10/2019 रोजी चालू वाहनातून वाहन क्रमांक एम.एच. 37 बी 1589 (टाटा एसी) या चालू वाहनातून भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार यांचा प्रचार सुरू असल्याचे पथक प्रमुख श्री.एस.आय.इंगळे यांना आढळून आले त्यांनी सदर वाहन धारक जगदीश शंकरराव खंडारे रा.कामरगाव यांचे विरुद्ध भां.द.वि.1860 चे कलम 188 अन्वये आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा शहर पोलीस स्टेशन कारंजा येथे दाखल करण्यात आला तसेच दिनांक 11/10/2019 रोजी चालू वाहनातून झेंडे लावून भाजपाचे अधिकृत उमेदवार यांचा प्रसार सुरू असल्याचे फिरते पथक प्रमुख मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद यांचे निदर्शनास आले त्यांनी त्याबाबत संबंधित वाहनाचे(एम.एच.37 बी.6697) वाहन चालक वामन नामदेव अम्बडायरे यांचे विरुद्ध भां.द.वि.1860 चे कलम 188 शहर पोलीस स्टेशन कारंजा येथे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रचाराकरिता वाहन परवाना देते वेळी दिलेल्या अटींचे पालन करण्याबाबत या पूर्वीच सर्व उमेदवार यांना सुचना देण्यात आल्या होत्या.

48 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close