गुन्हेगारी

चोरीच्या मोटर सायकल सह एका चोरट्यास अटक

स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी…

अमीन शाह

बुलडाणा , दि. १२ :- स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती वरून आज शहरातील जुन्या गावातून एका चोरट्यास चोरीच्या मोटरसायकल सह अटक करण्यात आली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार नांदुरा येथील रहिवासी नितीन भास्कर लहाने हे काही कामा निमित्त बुलडाणा येथे आले असता त्यांची स्प्लेनडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्याची तक्रार त्यांनी शहर पोलीस स्टेशन ला दिली होती दाखल तक्रारी वरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता आज स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली मिळालेल्या माहिती वरून त्यांनी येथील जुना गावातील रहिवासी स्वप्नील अंबादास गोरखा याला चोरीच्या दुचाकी सह अटक करण्यात आले आहे सदर कामगिरी पोलीस उप निरीक्षक इम्रान इनामदार , प्रकाश राठोड , नदीम शेख , अताउल्लाह खान , नदीम शेख , संभाजी असोलकर आदींनी पार पाडली.

66 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close