प्रशासन

संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी क्षणात पोहचणारा “पोलीस”

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पुणे , दि. १२ :- सर्वसामान्य नागरिकांना अडीअडचणीच्या काळात पुणे पोलीस कंट्रोल रूम मधील डायल 100 नंबर वर कॉल केल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील बीट मार्शल यांना त्याबाबत कंट्रोल रूम मार्फत माहिती दिली जाते. त्याप्रमाणे तात्काळ बीट मार्शल हे ( पोलीस ) संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी जात असतात. पुणे शहरांमध्ये अशा 100 नंबर ला येणाऱ्या कॉल वरून प्रत्यक्षात जागेवर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी हा सरासरी 32 मिनिटे असतो. परंतु मुंढवा पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक संतोष पाटमस यांनी या ड्युटी मध्ये विशेष कामगिरी व सतर्कता दाखवून कमीत कमी वेळात अडचणीत असलेल्या नागरीकांपर्यंत पोहोचण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. अडचणीत सापडलेल्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा रिस्पॉन्स टाईम हा 6.9 मिनिटे असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पुणे शहर यांनी अभिनंदन करून भविष्यातही त्यांनी अशीच तत्पर सेवा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पुणे व महाराष्ट्र पोलीसांप्रती नागरिकांचे मनात असलेला विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

143 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close