मराठवाडा

मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांचा जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केला सत्कार.

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १६ :- येथील अध्यापक व स्तंभलेखक मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी अनेक निवडणूकीसाठी स्वतः पीपीटी तयार करून मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे जिल्ह्यात उत्कृष्ट प्रशिक्षण घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे यांनी त्यांचा सत्कार केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
मागील वीस वर्षापासूून उत्तम कानिंदे हे मास्टर ट्रेनर म्हणून स्थानीक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कार्य करतात. स्वतः पीपीटी तयार करून प्रशिक्षण देतात. लोकशाहीला प्रगल्भ करणाऱ्या निवडणूकीच्या सर्व कार्यात ते स्वतःला झोकून देऊन कर्तव्य बजावतात याची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे (भाप्रसे ) यांनी त्यांचा सत्कार केला.
मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेत 83-किनवट विधानसभा मतदारसंघातील नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाची पाहणी व आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री डोंगरे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणात उपस्थित राहून किनवटचं प्रशिक्षण नियोजनबध्दरित्या जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ होत असल्याचे गौरोद्गार काढून मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांचा गौरव केला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल (भाप्रसे ), तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांच्या या गौरवाबद्दल शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) प्रशांत दिग्रसकर, डॉ. विलास ढवळे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, इब्टाचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने, सुदर्शन मेश्राम, संजय कराड, सूर्यकांत बाच्छे, ना.ना.पांचाळ, केंद्र प्रमुख रमेश राठोड, रविंद्र जाधव, केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, मुख्याध्यापक जीवन गुरनुले आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

32 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close