Home महत्वाची बातमी सरकारने “कोरोनाभय मुक्त भूकमुक्त अन्नदायी ” विशेष योजना राबवावी – सुरेश वाघमारे

सरकारने “कोरोनाभय मुक्त भूकमुक्त अन्नदायी ” विशेष योजना राबवावी – सुरेश वाघमारे

475

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई – चीनकडून आलेल्या अत्यन्त जीवघेणा व्हायरस आज संपूर्ण भारत देशात थैमान घालत असून दिवसेन दिवस कोरोना चा आकडा वाढतच चालला असून या भयंकर व्हायरस च्या आजाराला प्रतिबंध घालण्यास सरकारला अपयश येत असून अजूनपर्यंत या रोगावर औषध भेटू शकले नाही .या भीतीमुळे कित्येक लोकामधे भीतीचे सावट निर्माण झाले.हा आजार झाला समजायला साधारण २ते १६ दिवस लागतात अगदी आपल्या सभोवताली बसलेली व्यक्ती सुद्धा पिढीत आहे कि नाही हे समजणे कठीणं होऊन बसले आहे .अश्यातच सरकारणे २२ ला सर्वत्र जनता करफ़ू लावला त्यानन्तर आता संचारबंदी घरातच बसा या उपाय योजना ठीक आहे पण .लोकांच्या मूलभूत जीवनावश्यक गोष्टीचा विचार काय ?लोक अजून कितीदिवस घरी बसून पोट कसे भरणार हि चिंता घरी आ….वासून बसलीय जर अशीच परिस्थिती जास्त काळ राहिली तर गोरगरीब जनता जी झोपडपटीत राहते .रोज कामंकरून कमवून खाणाऱयांची दयनीय अवस्था खूप बिकट होत जाईल .आज जनतेला जी मदत लोकप्रतिनिधींकडून मिळायला पाहिजेत ती मिळत नाही .मतदानाच्या वेळी जसे घरपोच मताचा जोगवा मागण्यासाठी घरपोच फिरतात तसे आज नगरसेवक आमदार खासदार यांनी घरपोच सुरक्षित आरोग्य यंत्रणा मिळावी सॅनिटायझर्स मास्क उपलब्ध करून दयावे मात्र तसे काम होताना दिसत नाही .म्हणून आज सरकारने ठोस उपाय योजना म्हणून .”कोरोनारोगभयमुक्तभूकमुक्त अन्नदायी “विशेष योजना राबवून किमान २महिण्याचे रेशन घरपोच त्यात पालेभाज्यांसह कसे उपलब्ध होईल याबबाबत उपाय योजना आखण्यात यावी .जेणेकरून कुणी भूकबळी जाणार नाही याची अगोदरच तसदी घ्यावी अशी मागणी हल्लाबोल जनआंदोलन सेनेचे प्रमुख सुरेश वाघमारे यांनी सरकारला प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली असून याबाबाबत आपण मुख्यमंत्रीची भेट घेणार असून.येथील शोषित पिढीत गोरगरीब भूकेवाचून भूकबळी गेला नाही पाहिजेत यासाठी.

कोरो ना भयमुक्त भूकमुक्त अन्नदायी विशेष योजना राबवावी यासाठी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी जनतेला घरात बसा बाहेर पडू नका खायला नसेल तर आम्हाला कळवा आम्ही घरपोच रेशन पुरवू असे आवाहन असून ह्याच स्वरूपाची योजना जर किमान २महिने पुरविली तर जनतेवर उपासमारीची वेळ येणार नाही व राज्यात कुणीही भूकबळी जाणार नाही याची वेळीच ठाकरेंसारकरने खबरदारी घ्यावी घ्यावी.अशी कळकळीची मागणी सुरेश वाघमारे यांनी केली आहे .