मराठवाडा

तरुण व्हावळे यांचा सहकाऱ्यासह सखाराम बोबडे यांना पाठिंबा…

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

गंगाखेड , दि. १८ :- येथील आंबेडकरी चळवळीचे सक्रिय युवा कार्यकर्ते तरुणभाऊ व्हावळे यांनी आपल्या सहकार्‍यांसह गंगाखेड विधानसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना गुरूवारी आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष, धनगर साम्राज्य सेनेच्या पुरस्क्रत ऊमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर हे निवडणूक लढवत आहेत.धनदांडग्याच्या च्या शर्यतीत एक सर्वसामान्य कार्यकर्ता सामाजिक कार्याच्या जोरावर निवडणूक लढवत आहे. सखाराम बोबडे यांचे सर्व जातीधर्मातील कार्य पाहता यांच्यासारखा लोकशाही जिवंत ठेवणारा कार्यकर्ता सभाग्रहात जाणे आवश्यक आहे.

अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागावा यासाठी आपण सखाराम बोबडे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे तरुण व्हावळे यांनी जाहीर केले.यावेळी तरुणभाऊ व्हावळे, संतोष बोड्डावार, हनुमान भालेकर, चेतन शर्मा, साहिल चाऊस, विकी गायकवाड, गजानन भुसनर , धनगर साम्राज्य सेनेचे तालुका उपाध्यक्ष राम भंडारे, तरुण भाऊ मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सुपरिचित असलेले कपबशी हे चिन्ह मिळाल्याने सखाराम बोबडे यांनी या अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे.

74 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close