ताज्या घडामोडी

विधानसभा निवडणूकीसाठी किनवटमध्ये प्रशासन सज्ज

मजहर शेख

नांदेड/किनवट , दि . २० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता 83- किनवट विधानसभा मतदारसंघात दि. 21 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 328 मतदान केंद्रावर 328 ( राखीव 52 ) मतदान यंत्राद्वारे निर्भय, निःपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी एका केंद्रिय राखीव बलाच्या कंपनीसह 490 पोलिस अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या तैनातीसह दोन हजार अधिकारी कर्मचारी यांचेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय गोयल यांनी सांगितले.
किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 33 हजार 606 पुरुष, 1 लाख 25 हजार 843 स्त्री व 7 ( तृतीय लिंगी ) ईतर असे एकूण 2 लाख 59 हजार 456 मतदार आहेत. 328 मतदान केंद्रापैकी महात्मा फुले विद्यालय गोकुंदा व जिल्हा परिषद केंदिय प्राथमिक शाळा माहूर येथे फक्त महिला मतदान अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सखी मतदान केंद्र तसेच या दोन्हीही ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन आदर्श मतदान केंद्र आहेत. दिव्यांगासाठीच्या सुलभ निवडणुका अंतर्गत तिथे सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. 9 मतदान केंद्र संवेदनशील असून तेथे केंदीय राखीव बल तैनात केले आहेत. तसेच 16 सूक्ष्म निरीक्षक राहणार आहेत. या केंद्रासह 33 वेबकास्टींग तज्ज्ञ 33 मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया ( मतदान अधिकारी तीन पर्यंतची ) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन थेट प्रक्षेपित होणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील तहसिल कार्यालयातून रविवारी ( दि. 20 ) सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख, सर्वेश मेश्राम व मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्या कदम यांनी जीपीएस यंत्रणा बसविलेल्या वाहनाद्वारे मतदान पथके रवाना केली. याकरिता एस.टी. महामंडळाच्या बस 33, जीप 54, शासकीय वाहन 9, पाण्याचा टॅंकर 1 व अग्नीशमन वाहन 1 आदी वाहने अधिग्रहीत केली आहेत.
जिल्ह्यातील ईतर विधानसभा मतदारसंघातून येथे आलेल्या 425 मतदान केंद्राध्यक्ष व 398 सहायक मतदान केंद्राध्यक्ष व 774 इतर मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी एलईडी वॉलच्या सहाय्याने पॉवरपाईट प्रझेंटेशन द्वारे प्रशिक्षण दिले. पहिल्या सत्रात स्वामी मल्लीकार्जून, ग.नु. जाधव, रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर आदींसह सर्व मास्टर ट्रेनर्स यांनी सर्वांकडून मतदान यंत्र हाताळणी प्रात्यक्षिक करवून घेतले. परदानशीन महिला मतदारांसाठी महिला मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गटविकास अधिकारी सुभाष धनवे, बालविकास प्रकल्पाधिकारी प्रफुल बागल यांच्या समन्वयात सर्व फिरते व स्थानिक पथक, प्रवीण टिक्कास यांच्या समन्वयात 40 सहायक व क्षेत्रिय अधिकारी, स्वीप कक्ष प्रमुख सुभाष पवने तसेच नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, माधव लोखंडे, व्ही.टी. गोविंदवार, आदिंसह प्रकाश टारपे, अशोक कांबळे, नितीन शिंदे, गोविंद पांपटवार, रामेश्वर मुंडे, व्ही.टी. सूर्यवंशी, सत्यम हाके,के.डी. कांबळे, मिलिंद टोनपे, संदीप पाटील,एस.पी. जुंकटवार, राजू मुंडे, चंदू राठोड आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, शिपाई व कोतवाल निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

68 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close