ताज्या घडामोडी

स्वाभिमानी चे उमेदवार यांच्या वर गोळीबार करून त्यांचे वाहणावर पेट्रोल टाकून जाळले….!!

खळबळजनक घटना….!!

अमीन शाह

अमरावती , दि. २१ :- अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी भुयार यांच्यावर गोळीबार करून त्यांचे वाहणावर पेट्रोल टाकून जाळले. या हल्ल्यात भुयार यांच्यासह वाहनचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार हे शेंदुरजणाघाट ते धनोडी मलकापूर या मार्गावरून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी भुयार यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात भुयार यांच्या सह वाहनचालक जखमी झाला असून त्यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांच्यात काट्याची लढत होत आहे.दरमियान घडलेल्या घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे

262 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close