ताज्या घडामोडी

मतदानाच्या दिवशीच माजी सैनिकां ची आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

दुःखद घटना…

अमीन शाह

बुलडाणा , दि. २१ :- खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील एका माजी सैनिकांने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे आंबेटाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोपाल चराटे (४२) असे मृतक माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांनी खुशी गोपाल चराटे (१३) आणि यश यश गोपाल चराटे (११) या दोन मुलांसह रविवारी रात्री आंबेटाकळी शिवारातील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सकाळी तिघांचेही प्रेत विहिरीत तंरगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या का केली? याचे कारण समजु शकले नाही. घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.घडलेल्या घटने मूळे परिसरात दुःख वयकत केले जात आहे.

569 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close