सोलापुर

निवडणूकीची शर्यत , चिखल , खडयातील रस्त्यांची अडथळे पार करून बजावले मतदानाचे कर्तव्य

मतदान शांततेत पडले पार

रजनी साळवे

सोलापूर , दि. २१ :- जिलहयातील माळशिरस तालूक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरदार प्रमाणात पावसाने सतत धार चालू ठेवलयामूळे मतदान प्रक्रियेवर टांगती तलवार होती . मात्र पावसाने सुटी घेतल्यामूळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली . माळशिरस विधानसभेसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त केला होता. मात्र मतदानासाठी येताना मतदारांना अनेक लहान-मोठ्या रस्त्याने चिखल ओढ्या नाल्याचे पाणी यातून मार्ग काढीत मतदान केंद्र गाठावे लागले . पावसामुळे शेतीसह ह् अनेक कामांना मतदारांनी सुट्टी घेतली असल्यामुळे मतदान केंद्रावर दिवसभर मतदान करण्यासाठी ये-जा सुरू होती तालुक्यातील सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन जोरदार तयारी करीत होते तर कार्यकर्ते व नेतेमंडळींच्या ही प्रचाराची धामधूम सुरु होती. मात्र परतीच्या पावसाने दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने मतदानावर प्रक्रीयेवर सावट होते . मात्र आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली त्या मुळे मतदाना साठी दिवसभर गर्दी दिसत होती .मतदान केंद्रावर वृद्व व अपंगा ना वाहाणातुन आणले होते तर केंद्राच्या परीसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती .तालुक्यात मतदान शांततेत पार पडले .

31 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close