मराठवाडा

किनवट विधानसभा मतदारसंघात 70.63 शांततेत टक्के मतदान.

मजहर शेखनांदेड / किनवट , दि. 22 :- किनवट विधानसभा मतदारसंघात एक लाख 83 हजार 265 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 15 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. एकूण 70.63 टक्के मतदान झाले आहे . मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात शांततेत यशस्वी करण्यासाठी दोन हजार सहाशे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रचंड परिश्रम घेतले. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.328 मतदान केंद्रावर दिनांक 21 सोमवार रोजी सकाळी साडेपाच वाजता अभिरूप मतदानाला ( मॉक पोल) सुरुवात झाली. त्यावेळी काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने सात नियंत्रण युनिट (सीयू ), दोन मतदान युनीट ( बीयू ) व आठ व्हीव्हीपॅट आणि मतदान सुरू झाल्यानंतर दोन सीयू, सात बीयू व 21 अतिरिक्त व्हीव्हीपॅट देण्यात आले.एकूण एक लाख 33 हजार 606 पुरुष मतदारांपैकी 96 हजार 453 जणांनी ( शेकडा 72.19 ) , एक लाख 25 हजार 843 स्त्री मतदारांपैकी 86 हजार 806 जणींनी ( शेकडा 68.98 ) व इतर सात पैकी सहा तृतीय लिंगी मतदारांने ( शेकडा 85.17 ) असे एकूण 70.63 टक्के मतदारांनी मतदान यंत्रावर मते नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडले.दिव्यांग मतदारांनी स्वत व सोबत्याच्या मदतीने मतदान केले. सिलबंद झालेली मतदान यंत्रे मतमोजणी करीता शासकीय औद्योगिक संस्था येथे कडेकोट सुरक्षेत उभारलेल्या स्ट्राँग रुममध्ये सिलबंद केली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता..जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व निवडणूक निरिक्षक अभय राज यांच्या प्रेरणेने सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख, सर्वेश मेश्राम व मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्या कदम यांच्या सल्ल्याने निवडणूकीच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी सुभाष धनवे, बालविकास प्रकल्पाधिकारी प्रफुल्ल बागल, प्रवीण टिक्कास, स्वीप कक्ष प्रमुख सुभाष पवने, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, माधव लोखंडे, व्ही.टी.गोविंदवार , अभि. प्रशांत कुमरे, संदीप पाटील,एस.पी. जुंकटवार, व्ही.टी. सूर्यवंशी , राजू मुंडे, चंदू राठोड, मनोज कांबळे, एम.एम. कांबळे आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, शिपाई व कोतवाल आदिंनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. असे मिडीया कक्षाचे उत्तम कानिंदे यांनी कळविले आहे.सिंदखेड येथे ब्रेल मतपत्रिकेच्या आधारे दिव्यांग दाम्पत्याने सोबत्याविना मतदान कर्व्यव पार पाडले. स्वीप कक्षाच्या वतीने केलेल्या मतदार जनजागृतीमुळे निवडणूकीवर बहिष्कार टाकलेल्या अति दूर्गम पिंपळशेंडा, हडसणी व लिंबायत येथील बहाद्दर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .

48 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close