विदर्भ

शिक्षक मतदार नाव नोंदणी करण्यासाठी 6 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. 22 : मतदार नोंदणी नियम 1960 च्या नियम 31 (3) अन्वये मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी हक्कदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस यापुर्वी नाव नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मतदार नोंदणी नियम 1960 मधील तसेच दुसऱ्या अनुसूचिमध्ये दिलेला नमुना 19 मधील अर्ज दिनांक 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावा.

यापुर्वी आपला नमुना 19 मधील अर्ज सादर केला नसल्यास तो सर्व व्यक्तींनी दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. उपरोक्त सर्व तपशिल हा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या www.ceo.maharashtra.gov.in व विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या amravatidivision.gov.in या कार्यालयीन संकेतस्थळावर देखिल उपलब्ध आहे, असे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे.

40 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close