Foods

“विर शिवाजीराजे प्रतिष्ठाण” ची अनोखी दिवाळी…!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २५ :- विर शिवाजीराजे प्रतिष्ठाण तर्फे गरजुंना धान्य वाटप करुन सामाजिक प्रतिमेची , जाणीवेची ओळख करुन दिली आहे.

या प्रतिष्ठाणचे सामाजिक ऋण फेडण्याचे हे तीसरे वर्ष आहे. या वर्षी पांढरकवडा रोड स्थित वाकी या गावातील श्रीमती पंचफुला विष्णु शिंदे यांना दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी धान्य देण्यात आले.

या स्तुत्य उपक्रमासाठी प्रतिष्ठाणचे संस्थापक / अध्यक्ष श्री प्रसाद अवसरे यांनी पुढाकार घेतला. तसेच सर्व सदस्य संदीप मिश्रा, सागर लाकडे, सुरज दुम्पलवार, राहुल राठी, वरुण तोंदवाल, कुमार उमक, उदय नारसे, प्रवीण सिंगणजुडे, संकेत निम्बुलकर, शुभम गाडगे, श्रीनाथ पांडे, निरज येवतीकर इत्यादि उपस्थित होते. सोबतच वाकी गावाचे सरपंच श्री नितिन रमेश राऊत, पोलिस पाटील श्री राजेंद्र देठे व गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रधार श्री प्रसाद अवसरे यांनी सर्व सदस्य व गावकरी यांच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले..

205 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close