Home मराठवाडा कंधार व देगलूर तालुक्यातील सर्व खाजगी डाॕक्टरांना दिले दवाखाने सुरू ठेवण्याच्या सुचना

कंधार व देगलूर तालुक्यातील सर्व खाजगी डाॕक्टरांना दिले दवाखाने सुरू ठेवण्याच्या सुचना

244

नांदेड , दि.२७ ( राजेश भांगे ) – करोना विषाणूच्या अनुषंगाने कंधार तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांची आज दि.२७ मार्च रोजी मा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व कंधार तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.


तालुक्यातील सर्व दवाखाने (OPD) सुरू करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित डाॕक्टरांना देण्यात आल्या. तरी यावेळी उपस्थित डाॕक्टरांनी मनातील भिती व काहि शंका उपस्थित केले असता अधिकाऱ्यांनी त्यांची भिती व शंका आपल्या मार्गदर्शनातुन दुर केल्यावर सर्व डाॕक्टर आपले ओपिडि सुरु करण्यास तयार झाले. तरी सर्व डॉक्टरांना PPE किट व इतर आवश्यक सुरक्षा विषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
व सर्व जनतेने ( रूग्णांनी ) आपण OPD मध्ये जात असताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व आवश्यक असे अंतर ठेवून वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा व अनावश्यक गर्दी टाळावी असेही यावेळी अधिकाऱ्यांन कडुन सांगण्यात आले. असे कंधार नायब तहसिलदार विजय चव्हान यांनी कळविले.
व देगलूर येथील खाजगी दवाखाने सुरू करण्या संदर्भात आॕर्डर काढली आहे व त्या विषयी काल शहरातील डाॕक्टरांची बैठक घेण्यात आली. तरी या बैठकीस उपजिल्हाधिकारी शक्ति कदम, देगलुर तहसिलदार अरविंद बोळंगे, वैद्यकिय अधीकारी संभाजी पाटील, वैद्यकिय तालुकाधिकारी देशमुख व नायब तहसिलदार मकरंद दिवाकर आदि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील डाॕक्टरांची बैठक घेण्यात आल्याचे देगलूर तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी पोलिसवाला आॕनलाईन मिडियाशी बोलताना म्हणाले.
तरी आज सकाळ पासुन ते सायंकाळी पर्यंत देगलूर शहरातील सर्वच दवाखाने बंद असल्याचे दिसुन आले.