ताज्या घडामोडी

भयभीत महिलांनि केली पैनगंगा नदीची पूजा देवाला घातले साकडे

रस्ता बंद वीज पुरवठा बंद जन जीवन विस्कळीत…

अमीन शाह

बुलडाणा , दि. :- 3 नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्या अंतर्गत येणारे मानमोड घानमोड हे गाव, या गावाला सध्यस्थीती मध्ये पैनगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी लागलेले आहे ,या झालेल्या अतिवृष्टी मुळे गावातील लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात घराच्या भिंती पडल्या आहेत,टिन फुटले,गाव अंधारात असून महिलांसह सर्व नागरिक पुरामुळे भयभीत आहे रात्रभर कोणाच्या ही डोळ्याला डोळा लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पैनगंगा घेऊन गेली आहे व गावाला सर्व बाजूला पाण्याचा वेढा आहे ,पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी गावांतील घरांमध्ये येत आहे तरी सुद्धा शासन कुठल्याही प्रकारची कृती करत नाही, त्यामुळे दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन आपली व्यथा आलेल्या महापुराजवळ व्यक्त करत असून,रुढीपरंपरेनुसार पैनगंगा नदीची पूजा केली आहे.

शासन / प्रशासनाला एवढीच विनंती आहे की घानमोड मानमोड हे गाव खूप वर्षांपासून पुनर्वसनाच्या यादी मध्ये आहे परंतु अजून पर्यंत पुनर्वसित झालेले नाही त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून या लोकांची महापुरापासून सुटका करावी अशी विंनती मानमोड येथील सौ.कुन्ताबाई जाधव,सुलभा जाधव,प्रतिभा जाधव,नीता मवाळ,विजया पाटील,बेबाबई पाखरे,शीला बाई काळे,इंदूबाई जाधव,पार्थ पाटील,आश्विनी जाधव ,पुष्पांजली जाधव,सोनाली जाधव,रेखा,जाधव,कांताबाई गायकवाड आदी महिलांनी शासनाकडे आर्त हाक दिली आहे हे गांभिर्य लक्ष्यात घेऊन रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी तात्काळ कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना ही माहिती दिली असता लवकरच मानमोड गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

125 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close