मुंबई विभाग

मनपा टोपीवाला ग्राउंडवर गर्दूल्याच्या आणी असामाजिक तत्वांंचा अड्डा

रवि गवळी

मुंबई , दि. ०७ :- मालाड पूर्व येथील मनपा टोपीवाला शाळेच्या येथे असलेल्या ग्राऊंड हे प्रचंड अस्वच्छ झाले असून इथे गर्दुल्ल्यांचा आणि असामाजिक तत्वांचा अड्डा झाला असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मालाड पूर्व येथील असलेले हे ग्राउंड खरे तर शाळेतील विध्यार्थीसाठी खेळण्यासाठी राखीव ठिकाण आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत
असल्याने हे ग्राऊंड आणि परिसर प्रचंड अस्वच्छ झाला
आहे. या ग्राऊंडमध्ये समाजकंटक आणि गर्दुल्ले
येऊन बसतात आणि सर्रास नशापान करीत असताना
आढळतात. त्यामुळे इथे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला
आहे. त्याच बरोबर इथे असलेल्या अस्वच्छतेमुळे प्रचंड
दर्गंधी निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका
निर्माण होत आहे. या विभागात डेंगूचे प्रमाण देखील
वाढले आहे.

या बाबत जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था चे अध्यक्ष यांनी पालिकेला पत्र देऊन या विभागाची
साफसफाई आणि सुशोभीकरण करण्याची मागणी केली
आहे. त्याच बरोबर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची
मागणीहि केली आहे.

या ग्राऊंडची योग्य निगा राखल्यास हा विभाग देखील
मालाडकरांच्या आकर्षण ठिकाण होईल त्यामुळे या
बाबत पालिकेने लवकरात याकडे लक्ष देण्याची मागणी
केली आहे.

129 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close