गुन्हेगारी

यवतमाळ , वाशिम व नांदेड जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील चोरट्यांना अटक

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. 07: विदर्भ आणि मराठवाडामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यवतमाळ, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या या टोळीकडून पोलीसांनी चोरीच्या मोटारसायकलसुध्दा जप्त केल्या.

दिनांक 6 नोव्हेंबर 2019 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहवा / गोपाल वास्टर यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, तीन इसम एक चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने दिग्रस येथून पुसद मार्गे उमरखेडकडे जाणार आहेत. अशा खात्रीदायक माहितीवरून पोहवा / गोपाल वास्टरसोबत पोउपनी निलेश शेळके व त्यांच्या पथकाने शासकीय वाहनाने पंचासह रवाना होऊन साई मंदीर, उमरखेड रोड पुसद येथे सापळा रचून थांबले. असता माहिती प्रमाणे तीन संशईत एका मोटारसायकलवर भरधाव वेगात येतांना दिसल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यातील मागे बसून असलेला एक युवक पडून गेला व वाहन चालविणारा शेख अलताफ शेख मुस्ताक वय 21 वर्ष रा. स्वच्छता कामगार कॉलोनी वांगी रोड, परभणी, ता. जि. परभणी व त्याच्यासोबत मागे बसून असलेला एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्याब्यात घेतलेल्या दोन्ही युवकांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल त्यांनी दिग्रस येथून चोरल्याचे सांगितले. तसेच थोड्या वेळापूर्वी पळून गेलेला त्यांचा मित्र अमीर खान अफजल खान वय 23 वर्ष रा. साई बाबा नगर, वांगी रोड, परभणी ता.जि.परभणी व सय्यद अमीन सय्यद परवेज वय 21 वर्ष रा. मोतीनगर, दिग्रस जि. यवतमाळ यांनी मिळून दिग्रस, आर्णी, उमरखेड जि. यवतमाळ हदगाव जि. नांदेड व वाशिम जिल्ह्यात सुध्दा मोटारसायकली चोरल्याचे सांगून त्या मोटारसायकल दिग्रस येथील एका महिलेचे घरी ठेवल्याचे सांगितले. त्यावरून आरोपींतांनी सांगितलेल्या दिग्रस येथील एका महिलेच्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता तीच्या घरझडती मधून विविध कंपनीच्या आणखी आठ मोटारसायकल मिळून आल्या अशाप्रकारे विविध कंपनीच्या एकूण 9 मोटारसायकल किंमत अंदाजे 2 लक्ष 45 हजार रुपयाच्या मिळून आल्याने जप्त करून पोलीस स्टेशन दिग्रस, आर्णी जि. यवतमाळ हदगाव जि. नांदेड व वाशिम जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघळकीस आणले आहेत. आरोपी शेख अलताफ शेख मुस्ताक एक महिला एक विधी संघर्षेग्रस्त बालक यांना पुढील तपासकामी पोलीसस्टेशन दिग्रस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन दिग्रस करीत आहेत. एकंदरीत केलेल्या कार्यवाहीवरून सदर मोटारसायकल चोरीचे गुन्हे दिग्रस येथील एक महिला ती तीचे राहते घरी पर जिल्ह्यातील लहान मुलांना बोलावून त्यांना पैसाचे अमीश दाखवून करवून घेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नरूल हसन, सह. पोलीस अधीक्षक अनुराग जैन तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, प्रदीप शिरसकर, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पहुपनि निलेश शेळके पहुपनि सचिन पवार पोहवा गोपाल वास्टर पोना विशाल भगत, पंकज पातुरकर, मुन्ना आळे, पोलीस कॉन्टेबल मो. ताज, ड्रापोना / सुरेंद्र वाकोडे ड्रापोना, नागेश वास्टर सर्व स्थानिक गुन्हा शाखा, यवतमाळ तसेच पोलीस स्टेशन पुसद शहर येथील मपोका ज्योती राठोड व पोलीस स्टेशन दारव्हा मपोका शितल मोहिते यांनी पार पाडली.

126 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close