गुन्हेगारी

हिंगणघाट येथे सेवानिवृतिच्या केससाठी प्राचार्य , लिपिकाने मागितले ३० हजार

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

प्राचार्य सह लिपिक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

वर्धा , दि. ०८ :- जिल्ह्यातील हिंगणघाट येथे सेवानिवृत्त यापकाचे पेंशन केस संबंधात ३० हजाराची मागणी केल्याप्रकरणी शहरातील रा.सुं.बिडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यासह लिपिकाला अटक करण्यात आली असून ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उषाकिरण थुटे यांनासुद्धा चौकशी करीता ताब्यात घेतले आहे.येथील प्रा. शेषराव जुड़े यांच्या तक्रारिवरुन वर्धा येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने हिंगणघाट येथे संबंधित महाविद्यालय परिसरात कार्यवाही केली असून आज दुपारी २.१५ वाजता सदर कार्यवाही केली आहे.
डॉ शेषराव जुड़े (६१)हे रा.सुं.बिडकर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, ते नुकतेच ३१ जुलै,२०१९ रोजी सेवानिवृत्त झाले, त्यांचे थकित वेतन व सेवानिवृत्तचे लाभ देय होते, सेवानिवृत्तिची पेंशन केससुद्धा संस्थेने पाठविली नव्हती, त्यादाखल प्राचार्य यांनी त्यांना ५५ हजार१५५ रकमेची मागणी केली.

संस्थाध्यक्ष उषाकिरण थुटे यांना भेटल्यावर त्या ३० हजारात सौदा पटला, यादरम्यान जुड़े यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली.आज दुपारी महाविद्यालयातील प्राचार्य आंबट कर यांचे कार्यालयात धाड़ टाकून तीस हजार रकमेपैकी १० हजार रुपये घेतांना रंगेहात पकड़ले. संबंधित प्रकरणी लिपिक शेखर कुटे, प्राचार्य भास्कर आंबटकर,संस्थाध्यक्ष उषाकिरण थुटे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी ताब्यात घेतले. संस्थाध्यक्ष थूटे या वर्धा जिल्हा परिषदच्या माजी सभापती राहिलेल्या असून या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे.

39 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close