परभणी

रब्बीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे द्या…!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

@ सखाराम बोबडे पडेगावकर यांची मागणी @

गंगाखेड , दि. ०८ :- खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रब्बी हंगाम पेरणीसाठी शेतकरयाकडे पैसे नसल्याने शासनाने त्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शुक्रवारी गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यालयीन प्रमुख नवनाथ मुत॔गे याचे कडे गंगाखेड विधानसभेचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी निवेदन दिले. गंगाखेड उपविभागातील गंगाखेड, पालम, पूर्णा या तीनही तालुक्यात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिके गेली असून पावसामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलाअसताना रब्बी हंगाम तोंडावर आला. रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे,खते खरेदीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पेरणी साठी लागणारे खते व बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्याकडे करण्यात आली आहे. मागील वर्षी पिकविमा व दुष्काळाचे अनुदानही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करून न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, गंगाखेड तालुका उपाध्यक्ष राम भंडारे, दतराव करवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

237 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close