ताज्या घडामोडी

KBC या कार्यक्रमात छत्रपती शिवाजीमहाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादीची सोनी चॅनेलवर धडक

सोनी चॅनेलची लेखी माफी….

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यश

मुंबई , दि. ०८ :- (प्रतिनिधी) कौन बनेगा करोडपती ह्या कार्यक्रमात औरंगजेबाचा मुगलसम्राट म्हणून उल्लेख करण्यात येत आहे,तर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई अध्यक्ष Adv अमोल मातेले, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निलेश भोसले,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सुनील शिंदे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष Adv इंद्रपाल सिंग, युवक जिल्हा अध्यक्ष किरण मोरे .उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष- अजित रावराणे, उत्तर मुंबई कार्याध्यक्षा फेमिदा खान, मालाड तालुकाध्यक्ष जॅक डिसोझा ,युवक मालाड तालुका अध्यक्ष सुरेश वाघमारे. जिलाध्यक्ष अल्पसंख्यक विभागजिल्हा अध्यक्ष , जमाल शेख, मुंबई सरचिटणीस जिग्नेश शाह व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली* सोनी पिक्चर्सनेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इंटर्फेस बिल्डींग नंबर-७; मालाड लिंक रोड, मालाड (पश्चिम) या कार्यालयावर निदर्शने केली.
अखेरीस सोनी चॅनलने अधिकृत पत्र देऊन आपली चूक मान्य करीत माफी मागितली असे मालाड युवक अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी सांगितले.

64 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close