बुलढाणा

शेतकरी संघर्ष समिती कडुन करवंड,कव्हळा शिवारात नुकसानीची पाहणी…

शेतकर्याना दिलासा देण्याचा प्रयत्न…

[ शेतकरी प्रश्नावर संघटना एकत्रीत ]

अमीन शहा

बुलडाणा , दि. ०९ :- शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत ढोरे पाटील,विनायक सरनाईक,शेख मुक्तार,अनिल वाकोडे यांनी करवंड,कव्हळा,शिवारातील शेतकर्याच्या बांधावर पोहचुन प्रत्यक्ष पाहणी केली,यावेळी शेतकर्याना दिलासा देण्याचा प्रयत्न समितीकडुन करण्यात आला.
करवंड येथील शेतकरी सुधीर सुर्वे व अमोल जाधव यांच्या शेतात पडलेल्या सोयाबीनची पाहणी करुण कव्हळा शिवारातील लागलेल्या सुड्यांची व मळणीयंत्राद्वारे काढण्यात आलेल्या सोयाबीनची पाहणी शेतकरी संर्घष समिती कडुन करण्यात आली आहे,यावेळी समितीकडुन प्रशासकीय यंत्रणेव्दारे थेट शेतकर्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहेत,प्रशासन शेतकर्याच्या पाठीशी आहे.अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाल्याने बळीराजा प्रचंड संकटात सापडला आहे,दरवर्षी दिवाळीपुर्वी शेतकर्याच्या घरात शेतातील धान्याच्या रुपाने लक्ष्मीचे आगमण होते तेव्हा शेतकरी मोठ्या आनंदाने लक्ष्मीपुजन करतो मात्र यावर्षी सोयाबीन,कपाशी,तुर,मका व इतर पिकाचे नुकसान झाल्याने हाता तोडांशी आलेला घास हिरावल्या गेल्याने दिवाळी अंधारात गेली आहे,परंतु या संकटाला घाबरुण न जाता सर्वान मिळुन या संकटास मात देऊ असे समितीकडुन सांगुण शेतकर्याना दिलासा देण्याचा प्रयत्न समितीकडुन करण्यात आला दरम्याण सुरु असलेल्या घडामोडी पाहता पक्ष एकमेकांचे उनेदुणे काढुन तोंड सुख घेत आहेत,सरकार स्थापण करुने सोडुन पदासाठी वाद चालले आहेत,परंतु वरीष्ठ पातलीवरील वांद पाहता शेतकर्याच्या मनात चिंतेचा सुर आहे,यामुळे आम्ही चिखली तालुक्यात नियमीत अग्रेसर असलेल्या संघटना एकत्रीत घेऊन शेतकर्याना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगुण कुणाला काही अडचणी उद्भवल्यास किवा कुणी अधिकारी,कर्मचारी नाहकचा त्रास देत असेल किवा बँका कर्ज भरणा करण्यासाठी तगादा लावत असतील तर शेतकरी संघर्ष समितीला संपर्क करा असेही समितीच्या कार्यकर्त्याकडुन सांगीतले आहे,यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत ढोरे पाटील,विनायक सरनाईक,अनिल वाकोडे,शेख मुक्तार,रवींद्र डाळिंबीकर,शरद घुबे,भास्कर आडलकर,रामेश्वर इंगळे,मदन जाधव,संतोष जर्हाड, किशोर राठोड,शिवाजी जाधव,सोनू सपकाळ,अनिल जोशी आदी उपस्थित होते,

31 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close